Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या ढोल बजाओ सोये हुवे प्रशासन को जगाओ आंदोलनाला यश

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या ढोल बजाओ सोये हुवे प्रशासन को जगाओ आंदोलनाला यश
 


-अखेर सामाजीक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाकडून आंदोलनाची दखल  घेत 41.21 कोटी निधी विशेषबाब म्हणून मंजूर-


अकोला
 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या  वास्तू या ऐतिहासिक असून त्या वास्तू जीर्ण झाल्या असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन उदासीन असल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री भारत सरकार नामदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे व प्रदेश सचिव सचिन बनसोडे यांच्या आदेशावरून रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने विदर्भ सरचिटणीस तथा अकोला जिल्हाध्यक्ष आकाश हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली 10 सप्टेंबर 2024 रोजी अकोला शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे ढोल बजाओ सोये हुवे प्रशासन को जगाओ भव्य हजारो च्या संख्येने मोर्चा काढण्यात आला होता.सदर मोर्चाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 15 ऑक्टोबर 2024 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ विहार वस्तीगृह वडाळा मुंबई या वस्तीगृहाच्या इमारती करिता 41.21 कोटी रुपयांची विशेषबाब म्हणून मान्यता दिली असून शासनाच्या या निर्णयाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदासजी आठवले व रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा अकोला जिल्हाध्यक्ष आकाश हिवराळे यांनी आभार मानले असून समाजातील सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या