Ticker

6/recent/ticker-posts

हिरपूर ब्रह्माकुमारीद्वारे चैतन्य शक्तीचा सन्मान

हिरपूर ब्रह्माकुमारीद्वारे चैतन्य शक्तीचा सन्मान

 प्रतिनिधी नागोराव तायडे मूर्तिजापूर

ब्रह्माकुमारी शाखा हिरपूर च्या वतीने महिलांच्या शक्तींचा सन्मान व आदर करण्याकरता रोज त्यांचे पूजन करून सन्मान करण्यात आला. 


नवरात्रीमध्ये सर्वत्र देवीच्या विविध रूपांचे पूजन करण्याचा खूप ऊत्साह असतो. स्त्री शक्तीची उपासना असत्यावर सत्याचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय ,परंतु आपल्या घरातील, समाजातील माता-भगिनीचा पाहिजे तितका आदर सन्मान केल्या जात नाही. त्यांच्यातील शक्तींना महत्त्व दिले जात नाही. स्त्री मध्ये असलेल्या अगाध शक्तीचा अविष्कार जगाला दाखवला पाहिजे. संयमी असलेली स्त्री प्रसंगी किती बळकट होऊ शकते. आपल्यातील शक्तींची ओळख व्हावी याकरता रोज महिला आणि मुलींना देवी बनवून त्यांचे पूजन करण्यात आले तसेच दुर्गा, लक्ष्मी, काली, सरस्वती, ब्रह्मचारिणी, भवानी, अन्नपूर्णा हे स्त्रीच्याच विविध शक्तीचे रूप आहेत. देवीच्या विविध शक्तीचे महत्व रोज समजावून सांगण्यात आले. चैतन्य देवी बनण्याकरता स्वाती राजगुरे ,छाया गावंडे, सविता भालेराव, राशी गावंडे, अनिता हागे ,शुभदा कुलकर्णी ,ऋतुजा भालेराव ,रजनी बानूवाकोडे, किरण गुप्ता, वैष्णवी गावंडे, आदिती कुलकर्णी, दिव्या बुधेकर, दिपाली गावंडे यांनी सहभाग घेतला होता. शेवटच्या दिवशी सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाजवळ चैतन्य देवींना बसून सर्व भक्तांना आपल्या घरातील व समाजात दिसणाऱ्या माता-भगिनीचा सन्मान करणे हीच खरी पूजा आहे असे ब्रह्मकुमार प्रमोदभाई, राजेश भाई यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोपानभाई, गजाननभाई, बनारसेभाई, प्रविण ढगे यांनी परिश्रम घेतले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या