मजबूत सरकार स्थापण्यासाठी पक्षाला 70 दिवस द्या असे आव्हान - सहसंघटन मंत्री शिवप्रकाश
अकोला
महाराष्ट्रातील सरकारने 105 योजना सर्वसामान्यांसाठी लागू करून मातृ शक्ती ज्येष्ठ नागरिक युवाशक्तीचा सन्मान शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. महाराष्ट्राला महाशक्तिशाली निर्माण करण्यासाठी महायुतीचे सरकार भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती च्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भेदभाव मतभेद विसरून एका उद्दिष्टासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कार्यरत असून गेल्या चार पिढीपासून राष्ट्र निर्माण होते कोणती अपेक्षा न ठेवता कार्य करत आहे त्यांच्या बळावर अनेक आरोप झाल्यावर सुद्धा अनेक संकटावर मात करून पक्षाने राष्ट्रीय स्तरावर मानाचा स्थान प्राप्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळकटी प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रवादाचा सरकार मजबुती करण्यासाठी पक्षाला 70 दिवस द्या असे आव्हान भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश यांनी केले .स्थानिक सेंटर प्लाझा इथे अकोला लोकसभा व बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विस्तारक, आघाडी प्रमुख मंडळ प्रभारी मंडळ संयोजक विधानसभा संयोजक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मंचावर मध्य प्रदेशचे युवा कल्याण मंत्री कैलास सारंग बऱ्हाणपूरचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार डॉक्टर संजय कुटे खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल, संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर आमदार हरीश पिंपळे आमदार आकाश कुंडकर आमदार श्वेता ताई महाले, चैनसुख संचेती विजय जाधव, शाम बडे किशोर पाटील, जयंत मसने, सचिन पाटील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गणेश माटे, विजय अग्रवाल आधी विराजमान होते.
लाडकी बहीण, युवाशक्तीसाठी योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना मुलींना उच्च शिक्षणासाठी मोफत सोय, एक रुपयात शेतकऱ्याला पिक विमा तसेच विविध योजना सुरू करून महिलांना 50 टक्के एसटी सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन महायुती सरकार सुरू असून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला विजयी करण्यासाठी उमेदवार पेक्षा विचार महाराष्ट्राचा विकास एकमेव लक्ष ठेवून कार्य करा कार्यकर्त्याला पक्ष देण्यास अ समर्थ ठरला असला तरी आपला उद्देश आपल्या अनेक पिढीचा विचार करून नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांनी एकतेने पक्षाच्या विजयासाठी कामाला लागा असे आवाहन केले यावेळी भाजपा तर्फे मान्यवरांचा श्रीफळ शार देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी अनेक टिप्स प्रचाराची त्यांनी दिले बैठकीचा संचालन डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी तर प्रास्ताविक रणधीर सावरकर यांनी केले. यावेळी विस्तारक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
0 टिप्पण्या