30 अकोला पश्चिम मतदार संघामध्ये दुबार मतदार यादीतून वगळण्यासाठी निवेदन
अकोला
30 अकोला पश्चिम मतदार संघात मतदाराची दुबार मतदार अंदाजे ३४ हजार ४०० असुन लोकसभा निवडणुकीत दुबार मतदारांर विषयी तक्रार केली होती. त्या वेळेस कमी प्रमाणात मतदारांची नावे कमी झालेली आहेत. किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त जागी आहेत ह्यामुळे एकच व्यक्ती दोन वेळेस मतदान करु शकतो व मतदाराची नावे जास्त जागी असल्याने मतदान कुठे करावे ह्यामधे सुध्दा संभ्रम निर्माण होतो व त्या वेळेस निवणुकीच्या दिवशी वातावरण खराब होते व तणाव निर्माण होतो. मतदाराची दोन जागी नावे असणे ही तांत्रिक चूक सुध्दा असु शकते, मतदाराची नावे अनेक ठिकाणी असणे ही बाब अत्यंत गंभीर आहे वरील नावांची पळताळणी करुन मतदाराची एक पेक्षा अनेक वेळा असलेली नावे वळगळण्यात यावी व 30 अकोला पश्चिम मतदारसंघातील यादीमधील नावे दुरुस्ती करून यादी दुरुस्त करुन प्रसिद्ध करावी, अशा विनंतीचे निवेदन निवडणूक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांना निवेदनातून देण्यात आले. यावेळी विजयजी अग्रवाल,पवन महल्ले,प्रवीण झापर्डे, राजू भाऊ नेरकर, रुपेश फाटे,मनीष बुंदेले, गोपाल झापर्डे, श्रीकांत गावंडे, संकेत शर्मा, अतुल अग्रवाल आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या