Ticker

6/recent/ticker-posts

विकास कामे कागदोपत्री : लाखोंची उधळपट्टी

विकास कामे कागदोपत्री : लाखोंची उधळपट्टी 



वहाळा बु. येथे सचिवाचा प्रताप : सीईओकडे तक्रार


प्रतिनिधी नासीर शेख 
पातुर पंचायत समिती अंतर्गत वहाळा बु. येथे १ सप्टेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत सचिवांनी विकास कामे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांची देयक हडपल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्य संघपाल संसारे, ललिता गजानन चोरे, संध्या सदानंद मोरे, गोपाल गजानन सौंदळे, कुसुम राजेंद्र मोरे, या पाच सदस्यांनी १८ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे. जि.परिषद शाळेत आरओ फिल्टर मशीन न देता आरओ मशीन खरेदी कागदोपत्री दाखवून देयक काढले, भूमि गटारांचे काम,पाणी व स्वच्छता,यावर लाखोंची देयक काढली, नाली, पेव्हर ब्लॉकचे काम निकृष्ट दर्जाचे करून लाखोंची देयक काढली, व महिला प्रशिक्षणावर ५५ हजार रुपये,असे अनेक विकास कामे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांची देयक काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. कागदोपत्री केलेल्या कामाची मोका पाहणी करून सचिवावर कारवाई करून रकमेची वसुली करण्याची मागणी केली आहे.


बॉक्स 
या विषयावर सचिवाकडून बोलण्यास नकार 
विकास कामे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांची देयक काढण्यात आल्याचा आरोप पाच सदस्यांनी सीईओकडे दिलेल्या तक्रारीतून केल्याबाबत सचिव यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. 


 
लाखोंची उधळपट्टी : अभय कोणाचे? 
गावात विकास कामे झाले किंवा नाही याची पाहणी करूनच देयक काढण्याची परवानगी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळते, मात्र वहाळा बु.येथे विकास कामे कागदोपत्री दाखवून देयक कोणाच्या आदेशाने काढण्यात आले, याची सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया 
विकास कामे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांची देयक हडपण्यात आली, याबाबतची मोका पाहणी करून सचिवावर कारवाईसाठी सीईओकडे आम्ही पाच सदस्यांनी तक्रार दिली आहे.
संघपाल संसारे सदस्य ग्राम पंचायत वहाळा बु.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या