रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत एकाच रात्री दोन हत्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल रोजी रात्री 1.15 च्या सुमारास अतुल रामदास थोरात, रा.अण्णाभाऊ साठे नगर, अकोट फाईल, अकोला या युवकाची परस्पर वैमनस्यातून रेल्वे स्टेशन चौकात हत्या झाल्याची घटना घडली आहे. अकोला येथील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाय्रा तरुणाने धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या करुन घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ सतीश कुलकर्णी, रामदासपेठचे एसएचओ मनोज बहुरे आणि फॉरेन्सिक विभाग त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
या हत्येनंतर तासाभरात देशमुख फैल मधे दुसऱ्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. भवानी पेठेतील देशमुख फाईल जवळील एका घरासमोर ही हत्या घडली आहे. या हत्येत राज संजीव गायकवाड नावाच्या 18 वर्षीय तरुणाचाही धारधार शस्त्राने वार करुन हत्या झाल्याची माहीती प्राप्त झाली आहे . प्राप्त माहितीनुसार, आज रामनवमी निमित्त रॅली काढण्यात आली होती आणि या रॅलीत राजू गायकवाड हा देखील गेला होता. या मिरवणुकी दरम्यान राजूचा वाद देशमुख फाईल परिसरातील काही युवकांशी झाला होता. मात्र हे प्रकरण मित्रांच्या मदतीने तेथेच निपटवण्यात आले होते, परंतु, रात्री 2 वाजताच्या सुमारास राजूच्या घरी तीन अज्ञात इसमे आले आणि त्यांना घराबाहेर बोलावले. राजू घराबाहेर आला असता आरोपींनी त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. राजूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर आले असता आरोपी फरार झाले. राजूला तातडीने अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शहरात एकच दिवशी दोन हत्या घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील पोलीस तपास करीत आहोत.
0 टिप्पण्या