अवकाळी पावसाचा इशारा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
अकोला, दि. 22 : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात दि. 22 व २३ एप्रिल रोजी वादळ, अवकाळी पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी आदी शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आपला माल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. वीज व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
उष्माघातापासून बचावासाठी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
अकोला, दि. 22 :लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 06- अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदान दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. मतदारांनी उष्माघातापासून बचावासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
हे करा डोक्याला रूमाल, टोपी, छत्री वापरा. पुरेसे पाणी प्यावे. ताक, लिंबूपाणी,नारळ पाणी, ओआरएस आदी द्रवपदार्थ घ्यावेत. पातळ, सच्छिद्र, सुती कपडे वापरावे. तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. प्रवासादरम्यानपाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हाळ्यात काम करताना डोक्यावर टोपी, रूमाल, दुपट्टावापरावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशीलक्षणे व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा.रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजीघ्यावी. *हे करू नका* चप्पल न घालता, अनवाणी उन्हात चालू नये. लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना आत ठेवून गाडीबंद करू नये. मद्य, चहा, कॉफी, खूप साखर असलेले किंवा कार्बोनेटेड द्रवाचे सेवन टाळावे.गडद, घट्ट व जाड कापड घालण्याचे टाळावे.बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाककरणे टाळावे व स्वयंपाकघराची दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात. ज्वलनशील पदार्थांपासूनदूर राहावे.
0 टिप्पण्या