Ticker

6/recent/ticker-posts

ओबीसी बहुजन पार्टीचे ऍड. अविनाश भोसीकर यांना मिळावी वंचितची नांदेड ची उमेदवारी

ओबीसी बहुजन पार्टीचे ऍड. अविनाश भोसीकर यांना मिळावी वंचितची नांदेड ची उमेदवारी


अकोला वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यात नांदेड येथील जागा रिकामी आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे ओबीसी बहुजन पार्टीचे ऍड. अविनाश भोसीकर यांना वंचितची नांदेड ची उमेदवारी मिळावी. अशी मागणी ऍड. अविनाश भोसीकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन केली आहे.


ऍड. अविनाश भोसीकर हे नामवंत वकील असून फुले शाहू आंबेडकर विचार मानणारे बहुजन आहेत. त्यातच ते ओबीसी बहुजन पार्टीचे मराठवाडा पदाधिकारी आहेत. मोदी व आर एस एस ला हरवीण्यासाठी बहुजन विचाराचे कार्यकर्ते वंचितला हवे आहेत. त्यामुळे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेत ओबीसी बहुजन पार्टीचे शेंडगे हे सांगली मध्ये उमेदवारी दाखल करीत असतील तर त्यांना पाठींबा देण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार मराठावाड्यातील नांदेड लोकसभा मतदार संघात वंचित च्या तिकिटावर लढण्यासाठी तयार असून वंचित बहुजन आघाडीने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत केली आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या