11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले समिती भव्य शोभायात्राचे आयोजन
क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने अकोला महानगरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 11 एप्रिल 2024 गुरुवार या रोजी सायंकाळी पाच वाजता महाराणा प्रताप बाग, सिटी कोतवाली चौक ते अशोक वाटिका भव्य पायदळ शोभायात्रे चे आयोजन करण्यात आले आहे, ही शोभायात्रा गांधी रोड, प्रमिलाताईओक हॉल मुख्य मार्गाने अशोक वाटिका येथे या यात्रेचा समारोप होईल .तरी या भव्य शोभायात्रेत सर्व जाती-धर्माच्या सर्व संघटनांनी तसेच माझ्या सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहपरिवार सहभागी व्हावे व या यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती महोत्सव समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ .माया इरतकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या