Ticker

6/recent/ticker-posts

गोवंश तस्करावर नवनियुक्त अधिकारी कैलास भगत यांची धडक कारवाई

गोवंश तस्करावर नवनियुक्त अधिकारी कैलास भगत यांची धडक कारवाई


गोवंश तस्करी करणारे दोन आरोपी जेरबंद पोलिसांची धडक कारवाई


अकोला प्रतिनिधी संतोष माने

मुर्तीजापुर : गोवंश तस्करी करून कत्तलीसाठी कारंजाला घेऊन जाणारे 7 जनावरे आणि दोन आरोपींना जेरबंद करण्यात नवनियुक्त अधिकारी कैलास दत्तू भगत ग्रामीण पोलीस स्टेशन च्या चमूला यश आले आहे. नुकतेच रुजू झालेले प्रभारी अधिकारी कैलास भगत यांची मुर्तीजापुर ग्रामीण परिसरात धडक कारवाई सुरू असून आज 1 मार्च रोजी भर दिवसा 3:00 वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे गोवंश तस्करीचे अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्र. एमएच 37 टी 3066 नाकाबंदी करून पकडले आहे. मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यांतर्गत तालुक्यांमधून गोवंश तस्करी सुरू आहे. नवनियुक्त प्रभारी अधिकारी कैलास भगत यांनी कारभार हाती घेतल्यावर या भागात सुरू असलेले अवैद्य धंद्यांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज गोवंश तस्करी करणारे वाहन पकडून 7 गोवंश जनावरांची सुटका व दोन आरोपींना जेरबंद केले आहे.


ही कारवाई तालुक्यातील कंझरा रोडवरील सारासार रिसॉर्ट जवळ वाहन वाहन जप्त करण्यात आले असून 7 गोवंश जनावरांना पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थान मुर्तीजापुर येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. एकूण जप्त केलेल्या जनावरांची किंमत 88,000 रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे मुर्तीजापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात नवनियुक्त अधिकारी कैलास भगत यांच्या चमूने केली आहे. पुढील कारवाई ते स्वतः करीत आहेत. सदर कारवाईमुळे गोधन तस्करीला आळा बसणार असून तस्करी करणाऱ्यामध्ये भीती निर्माण झाली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या