Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भ लोककलावंत संघटना देणार,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना कलावंताच्या समस्याचे निवेदन

विदर्भ लोककलावंत संघटना देणार,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना कलावंताच्या समस्याचे निवेदन


 "केन्द्रिय मंत्री ना.आठवले यांचे दि.15 जानेवारी 2024 रोजी वाशिम येथे होणार आगमन"

वाशिम : संपूर्ण महाराष्ट्रात वृद्ध साहित्यीक अष्टपैलू कलाकार, लोककलावंत आणि सेवाव्रती सामाजिक कार्यकर्त्याच्या विविध मागण्या प्रत्यक्ष महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सामाजिक न्याय विभागाकडूनच,गेल्या सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकांपासून प्रलंबित ठेवण्यात आलेल्या असून हा तळागाळातील, सर्वसामान्य, बहुजन नागरीकांवर एक प्रकारे शासनाकडूनच अन्याय होत असल्याची भावना बहुजन,भटक्या विमुक्त,सेवाव्रती सामाजिक कार्यकर्ते आणि शासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती तथा व्यसनमुक्ती करणाऱ्या अष्टपैलू कलाकार लोककलावंतामधून स्पष्टपणेच व्यक्त होत आहे.त्यातच महाराष्ट्रातील बहुजनांचे आशास्थान असलेले लोकप्रिय केन्द्रिय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदासजी आठवले यांचे सोमवार दि 15 जानेवारी 2024 रोजी आगमन होत असून जिल्ह्यातील विदर्भ लोककलावंत संघटनेचे पदाधिकारी,महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारार्थी संजय कडोळे, ज्येष्ठ कलावंत प्रदिप वानखडे,कैलास हांडे,भाष्करराव कांबळे, राजाराम पाटील राऊत, लक्ष्मणराव इंगळे इत्यादी मंडळी त्यांना वाशिम येथे वाटाणे लॉनवरील कार्यक्रमात भेटणार असून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या, प्रलंबीत असलेल्या खालील न्याय्य मागण्यांबाबतचे निवेदन देणार आहेत.सामाजिक कार्यकर्ते तथा कलावंतांच्या मागण्या १) शासनाने वाढत्या महागाईचा विचार करून वृद्ध साहित्यीक कलाकाराचे किमान मानधन दरमहा पाच हजार रुपये तरी करावे.२) पाच वर्षापासून स्थगीत असलेल्या जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीची पुनर्रचना करून गठन करावे.३) वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती मध्ये राजकिय कार्यकर्त्याचा समावेश न करता केवळ लोककलावंताना स्थान मिळावे.४) गेल्या पाच वर्षापासून मानधना करीता प्रलंबीत असलेल्या कलावंताचे नियमानुसार दरवर्षी शंभर प्रमाणे पाचशे कलावंताचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना मानधन सुरू करावे.५) प्रलंबीत मृतक लोककलावंताच्या वारसदारांना मानधन सुरु करावे. ६) गेल्या पाच वर्षापासून प्रलंबीत असलेला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा,सामाजिक कार्यकर्ता संमेलन तथा व्यसनमुक्ती साहित्य संमेलन घेऊन ,डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार,पद्मश्री कर्मविर दादासाहेब गायकवाड पुरस्कार,संत रविदास महाराज पुरस्कार तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे वितरण करण्यात यावे. ७) महाराष्ट्र शासनाच्या सर्वच पुरस्कारार्थींना दरमहा किमान पाच हजार रुपये प्रमाणे मानधन सुरू करण्यात यावे.
८ ) महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारार्थींना भारतिय रेल्वे प्रवासामध्ये मोफत सवलत मिळावी.९ ) बहुजन समाजातील सप्तखंजेरी राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा सर्वोच्च असलेला,महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा. आदी रास्त मागण्यांचे निवेदन विदर्भ लोककलावंत संघटनेकडून केन्द्रिय मंत्री ना.रामदासजी आठवले यांना देण्यात येणार आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या