Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान साधणार नव मतदारांशी थेट संवाद- आ.रणधीर सावरकर 

पंतप्रधान साधणार नव मतदारांशी थेट संवाद- आ.रणधीर सावरकर 


अकोला-  नव मतदारांशी थेट संवाद देशाचे यशस्वी पंतप्रधान धर्म पारायण आणि मानवतेचे कार्य करणारे नरेंद्र मोदी अकोला जिल्ह्यातील व देशभरातील 18 वर्षे ते 21 वर्षातील नव मतदारांशी थेट संवाद साधणार आहे व त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे हा आगळावेगळा कार्यक्रम अकोला जिल्ह्यात दहा ठिकाणी होऊन 25 हजार 9 मतदार यामध्ये सहभागी होणार आहे 25 जानेवारी गुरुवार रोजी सकाळी 9.30 वाजता नव मतदारांशी थेट संपर्क साधणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिली आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात च्या मैदानात हा कार्यक्रम होणार आहे. चोहटा बाजार येथे स्वर्गीय शंकरराव बुदे यांच्या महाविद्यालय परिसरात होणार आहे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते अकोट पंचायत समितीचे उपसभापती संतोष शिवरकर व अकोला महानगर अध्यक्ष पवन महल्ले यांच्या नेतृत्वात मतदारांची थेट संपर्क साधण्याचा काम सुरू आहे श्रीमती राधादेवी गोयंका महाविद्यालय या कार्यक्रमात आमदार रणधीर सावरकर स्वतः उपस्थित राहणार आहेत.


 शिवाजी महाविद्यालय येथे कार्यक्रमात भाजपा महानगराध्यक्ष जयंत मसने, तर स्थानिक बस स्थानक परिसरातील महेरबानू महाविद्यालयात अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख विजय अग्रवाल हे उपस्थित राहणार आहे तर मुर्तीजापुर येथे आमदार हरीश पिंपळे तर अकोट येथे शिवाजी महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात आमदार प्रकाश भारसाकले, बार्शीटाकळी येथे होणाऱ्या कार्यक्रमात हिरासिंग राठोड संजय इंगळे तर चोहटा बाजार येथे अकोला भाजपा ग्रामीण अध्यक्ष किशोर मागटे पाटील संतोष शिवरकर राजू नागमते, अनु पधोत्रे मालेगाव नकुल देशमुख रिसोड तर पातुर येथे सिन्हा महाविद्यालय महाविद्यालय येथे भाजपा ओबीसी आघाडीचे नेते बळीराम सिरस्कार तर सरस्वती महाविद्यालय पारस येथे तेजराव थोरात माधव मानकर, तालुकाध्यक्ष मंडळ अध्यक्ष उपस्थित राहणाऱ्या शहरातील विविध भागातील मतदार या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे नव मतदारांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नऊ मतदानाविषयी असलेले मत नव मतदारांचे असलेले सरकार विषयी मत अडचणी व संवाद या कार्यक्रमात आपण उपस्थित रहावे अशी विनंती भाजपातर्फे करण्यात आली आहे 25 हजार पेक्षा जास्त मतदार या कार्यक्रमात उपस्थित राहण्याच्या दृष्टीने भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता युवा मोर्चा युवती आघाडी शेतकरी आघाडी तसेच विविध आघाडीचे प्रमुख कामाला लागले आहे भाजपाचे मंडळ अध्यक्ष सरचिटणीस विविध सक्रिय कार्यकर्ते नव मतदारांची थेट संवाद साधून पंतप्रधानाच्या संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची जय्यत तयारी विशेष स्क्रीन लावून करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना युवा संघटना क्रीडा संघटना व शैक्षणिक संस्था या कार्यक्रमात सहभागी होणार आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या