सैयद मोहसीन उर्दू हायस्कूल शिवनी येथे २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
आज यंग मुस्लिम एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी पातूर व्दारा संचलित सैयद मोहसीन उर्दू हायस्कूल शिवनी येथे २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहेमद खान पठान होते तर प्रमुख अतिथी महणुन शेख समसूल कमर महानगर महासचिव वंचित बहुजन आघाडी डॉ आरीफ शाह साहेब अब्दुल हाफिज गुफरान खान शेख इब्राहिम व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते ध्वजारोहण चा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक सैयद मोहीब इकबाल यांचे हस्ते करण्यात आला त्यानंतर ८ वी ते १२ वी चे विद्यार्थी महेक अकबर खान पठान अनायबा तसमीया. अजल्फा अनम उस्मान खान मोहम्मद सलमान सैयद शहजाद साबरा अंजुम अशमीरा अंजुम सुमय्या परवीन आलिया सदफ यांनी सामुहिक गीते सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले शाळेतील शिक्षक असीमोदीन आपले मनोगत व्यकत करताना सांगीतले भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.
संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, तेथील नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते.
कार्यक्रमाच्या शेवटी वक़ुतत सर्पधा व कला सपर्धा मध्ये सहभागी विधाथ्याना प्रमाणपत्र व मेडल वितरीत करण्यात आले सुत्रसंचालत संचलन महेक अनम यानी केले तर आभार प्रदर्शन मो अनवारोदीन सर यानी केले कार्यक्रम यशस्वी करण्या साठी शिक्षक मोहम्मद जाहिद शमशेर खान शिक्षकेत्तर कर्मचारी अजमतुललाह खान काजी मोइन मोहम्मद फारुख अब्दुल शकुर सैयद वसीम परीश्रम घेतले-




0 टिप्पण्या