Ticker

6/recent/ticker-posts

अयोध्या येथील श्री राम मंदिर उद्घाटन प्रसंगी अकोला शहरातील वीस राम मंदिरात होणार विशेष पूजा अर्चना

अयोध्या येथील श्री राम मंदिर उद्घाटन प्रसंगी अकोला शहरातील वीस राम मंदिरात होणार विशेष पूजा अर्चना


अकोला धार्मिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संवर्धनासाठी कार्यरत श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था व स्वर्गीय अरुण भाऊ जीरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्यावतीने 140 कोटी जनतेचे आराध्य दैवत व हिंदुस्थानची ओळख असणारे श्री प्रभू रामचंद्राचा दिव्य मंदिर श्री जन्मस्थानी श्री अयोध्या धाम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत असल्याने अकोला शहरातील वीस राम मंदिरात श्रीराम ध्वजा, श्री राम ज्योती, वेदपाठी ब्राह्मणांच्या हस्ते विशेष पूजा अर्चना गजानन महाराज दवाराज स्थापित शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात 15 जानेवारी सोमवार दुपारी साडेबारा वाजता होणार आहे व त्यानंतर शहराच्या मंदिरात देण्यात येणार आहे अशी माहिती अनिल मानधने, संजय जीरापुरे यांनी दिली. 16 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत श्री अयोध्या धाम येथे विविध कार्यक्रम होत असून या निमित्ताने श्री जानकी जानकी वल्लभो सरकार धर्माथ, संस्था व स्वर्गीय अरुण भाऊ जीरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्यावतीने श्रीराम स कीर्तन जब राम कथा रामायण रांगोळी, प्रतिकात्मक कार सेवकांचा सत्कार तसेच राम ज्योत प्रज्वलित करण्याचे काम होणार आहे यासाठी गिरीराज तिवारी गिरी शजोशी, हिम्मत चौधरी , हरीश चौधरी संजय अग्रवाल सागर भाऊ भारूका, श्रीराम संस्थेच्या अध्यक्ष सुमनदेवी अग्रवाल विनायक शांडिल्य गुरुजी विजय अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम वेदपाठी ब्राह्मणाच्या उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमात सर्व रामभक्तांनी सक्रिय सहभाग घ्यावा अशी विनंती आयोजकातर्फे करण्यात आली आहे

आम्ही २२ जानेवारीला काय काय करणार?

√.घरातील देव्हारा सजवणार 
√.रांगोळ्या घालणार 
√.दिव्यांच्या माळा लावणार 
√.राम दिवा लावणार 
√.छान छान पणत्या लावणार 
√.कंदील लावणार 
√.फटाके फोडणार 
√.घरात गोडधोड करणार 
√.गोडधोड पदार्थ सगळ्यांना वाटणार 
√.नवीन कपडे घालून मंदिरात जाणार 
√.पताका तोरणं लावणार
√.आपल्या जीवनात दोन वेळा दिवाळी साजरी करण्याचा योग हा ५०० वर्षांच्या प्रतिक्षे नंतर आला आहे तर तुम्ही पण करा आणि आपल्या शेजारील लोकांना पण सांगा

जय श्रीराम
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या