Ticker

6/recent/ticker-posts

तिर्थक्षेत्र कारंजातील माऊलीच्या ऐतिहासिक मानवता पदयात्रेत स्वेच्छेने एकत्र या. -सुरेश भाऊ गढवाले

तिर्थक्षेत्र कारंजातील माऊलीच्या ऐतिहासिक मानवता पदयात्रेत स्वेच्छेने एकत्र या. -सुरेश भाऊ गढवाले 


              
 कारंजा : सुमारे चौदा वर्षापूर्वी सन 2011 मध्ये सुरेशभाऊ गढवाले, सुनिल गुंठेवार, संजय कडोळे,भगवान खेमवानी, राजाभाऊ शेळके,सुनिल माकृवार, शंकर संकेत, राम गटागट इत्यादी निवडक वारकऱ्यांनी एकत्र येऊन,रंजल्या गांजल्या आम्हा वेड्या भाविकांची माऊली मुंगसाजी महाराजांच्या दर्शनाचे ओढीने कारंजा ते धामणगाव देव पर्यंतची पायी पदयात्रा करून माऊली चरणी लिन होत दर्शन घेतले आणि मग दरवर्षी नववर्षच्या प्रारंभी माऊली दर्शनाचा जणू पायंडाच पडला. माऊलीच्या भक्तीने दंग झालेल्या आम्हा वारकरी मंडळीवर माऊलीची कृपादृष्टी होऊन आम्हाला स्वाभिमानाने जगण्याचे बळच मिळाले व पुढे आम्ही "माऊली सेवा समिती" स्थापन करून माऊलीच्या इच्छुक भक्तांना पदयात्रेत सामिल करून घेतले. 


त्यामुळे आपसुखच पदयात्रेचा प्रसार होऊन हळू हळू वारकऱ्यांची संख्या वाढवून आजच्या परिस्थितीला माऊलीचे जवळ जवळ तिन साडेतिन हजार भाविक महिला पुरुष भक्त माऊलीच्या कारंजा ते धामणगाव देव पदयात्रेत स्वेच्छेने सहभागी होत असतात. कारंजा ते धामणगाव देव पालखी पदयात्रा सोमठाणा घाटातून जात असतांना तर पालखी पदयात्रेचे खूपच विलोभनिय विहंगम दृश्य दिसते. व हे दृश्य पाहून माऊलीच्या श्रीक्षेत्र पंढरपूर पालखी पदयात्रेची अनुभूती मिळते.शिवाय सदर पालखी पदयात्रेत सहभागी होणाऱ्या वारकरी मंडळीच्या चहापान, अल्पोपहार आणि महाप्रसादाची चोख व्यवस्थाही माऊलीचे भक्त स्वेच्छेने स्वतःहून करीत असतात.हे या सर्वधर्मिय समभाव आणि अलौकिक मानवतेची गंगा ओसंडून वाहविणाऱ्या आमच्या पदयात्रेचे वैशिष्ट होय.तरी सालाबादप्रमाणे रविवारी दि. 07 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठिक 07: 30 वाजता पहाडपुरा येथून श्रीक्षेत्र धामणगाव देव कडे मार्गक्रमण करणाऱ्या पालखी पदयात्रेत माऊली भक्तांनी अलौकिक शांती,बंधुता,श्रद्धा व मानवता दर्शवित इ.सन 2024 हे नविन वर्ष तिर्थक्षेत्र कारंजातील सर्व कारंजेकरांना सुख, समाधान, आनंद,भरभराट व आरोग्यदायी जावो ह्यास्तव सहभागी व्हावे असे विनम्र आवाहन माऊली सेवा समितीचे सेवाधारी सुरेशभाऊ गढवाले यांनी केले असल्याचे वृत्त सेवाधारी संजय कडोळे यांनी कळविले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या