Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय संविधान आणि 26/11 मधील शहिदांना नमन करून आदरांजली

भारतीय संविधान आणि 26/11 मधील शहिदांना नमन करून आदरांजली
 

अकोला- देशासाठी प्राण देणारे त्यांच्या कर्तुत्वाला नमन करणे व नागरिकांचा प्राण वाचून कर्तव्य करणाऱ्या शहिदांना नमन करणे व त्यापासून दखल घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकवला व त्यामुळे 26 /11 पुन्हा देशात घडणार नाही.  देशाच्या संविधानाला नमन करणे संविधानाचा संरक्षण करणे संविधानाचे वाचन करणे संविधानाचा नियमाचा पालन करणे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देणे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार वसंत खंडेलवाल यांनी केले. स्थानिक गोडबोले हुतात्मा स्मारक इथे मुंबई येथील 26/11 च्या घटनेमधील शहिदांना नमन तसेच संविधान वाचन कार्यक्रम व संविधान शपथ कार्यक्रमात ते बोलत होते. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर मागटे पाटील हे होते तर प्रमुख अतिथी , महानगर अध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, वसंत बाछुका , संजय गोटफोडे, ॲड देवाशिष काकड, विनोद मनवानी, कृष्णा शर्मा, हरिभाऊ काळे, ॲड सुभाषसिंह ठाकूर, पवन पाडिया, संतोष पांडे ,दिलीप मिश्रा, रमेश करिहार, सुमन गावंडे, जान्हवी डोंगरे, सोनी आहुजा, भन्सालीजी, हेमंत शर्मा , प्रशांत अवचार , सुजित ठाकूर, सुनील बाठे, सोनू देशमुख राजेश वगारे ,दिलीप भरणे, ॲड नितीन गवळी,अमोल मोहोकार, कपिल बुंदिले, डॉक्टर किशोर मालोकार, कोकणराव सोनवणे सोनू देशमुख राजेश वाघारे मनोज शाहू अमोल मोहकार पवन पाडिया रवी भन्साली आदी प्रामुख्याने उपस्थित होते ‌. विजय अग्रवाल यांनी संविधान चे महत्त्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे मेहनत व त्यांचे उपकार समाजाप्रती असलेली भावना याबद्दल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य घरोघरी पोहोचविण्याचे आवाहन केले व भारतीय जनता पक्षाने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे तेल चित्र संसद भवन नाणे दिल्ली लंडन मऊ इंदू मिल ते स्मारक बांधण्याचं काम केलं मताचा राजकारणापेक्षा मानवता व देशासाठी त्याग करणाऱ्यांचा सन्मान करणे ही संस्कृती जपण्याचा काम भारतीय जनता पक्षात सातत्याने करीत असल्याचेही यावेळी सांगितले यावेळी संविधानाचे महत्त्व व 26 11 ही घटना दुर्दैवी असून शहिदांना नमन करणे त्यांच्यापासून प्रेरणा घेणे त्यांच्या कार्याला सलाम करणे हे कर्तव्य असल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले. संविधान ची शपथ एडवोकेट देवाशिष काकड यांनी वाचन करून सगळ्यांना घेण्यात लावली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या