Ticker

6/recent/ticker-posts

वैविध्यपूर्ण भारतीय लोकनृत्याचे सादरीकरण करून मनुबालांनी जिंकली सर्वांची मने

वैविध्यपूर्ण भारतीय लोकनृत्याचे सादरीकरण करून मनुबालांनी जिंकली सर्वांची मने


 नवरात्रोत्सवाच्या या पर्वामध्ये मंगलमय व उत्साही वातावरणात दिनांक 20  व 21 ऑक्टोबर 2023 रोजी शारदा देवीची स्थापना मनूताई कन्या शाळेत करण्यात आली.   ज्या भारतीय राज्यांमध्ये नवरात्र उत्सव सादर करण्यात येतो त्यांची पोस्टर्स तयार करून शारदा देवीच्या दालनाची सजावट करण्यात आली होती. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना विविध राज्यांची माहिती होण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी मनूताई कन्या शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेडीज होमक्लास सोसायटीच्या अध्यक्षा सौ पल्लवीताई कुलकर्णी होत्या. कार्यक्रमाला  विशेष अतिथी सौ निता जाधव (बिडवे) होत्या तसेच प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर सौ संगीताताई सुरंशे तसेच शिशुवाटिकेच्या  संचालिका सौ दीप्तीताई गदाधर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ऐश्वर्याताई धारस्कर,  संस्थेचे सल्लागार श्री अनिरुद्ध चौधरी,  असे सर्व मान्यवर मंचावर स्थानापन्न झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शारदा देवीचे पूजन, दीपप्रज्वलन व हारार्पण  करण्यात आले. आरती म्हणण्यात आली. नंतर पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सौ   देशमुख मॅडम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.  धारस्कर व अध्यक्ष सौ.  कुलकर्णी, विशेष अतिथी सौ.  जाधव (बिडवे), प्रमुख अतिथी सौ.  सुरंशे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.  मैदानी स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले शाळेच्या क्रीडा शिक्षिका पर्यवेक्षिका श्रीमती  मांगे यांनी. तसेच दिनांक 18 ऑक्टोबर रोजी शाळेमध्ये भजन स्पर्धा स्मरणशक्ती स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याचप्रमाणे दिनांक 19 ऑक्टोबरला रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते  एन एम एम एस परीक्षे मध्ये शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनी कुमारी  भटकर व  पवार यांच्यासह मैदानी स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थिनी तसेच भजन स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या मुलींना अध्यक्षांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे वितरित करण्यात आली.  त्याचप्रमाणे मुलींच्या यशाबद्दल क्रीडा शिक्षिका श्रीमती मांगे मॅडम यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला शिशुवाटिकेतील चिमुकल्यांनी स्तोत्र म्हंटली व गाणी गायली त्यांना सुद्धा बक्षीस वितरण करण्यात आले. 


त्यानंतर आगळावेगळा असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला .विविध राज्यांचे लोकनृत्य अतिशय कलात्मकतेने सादर करून विद्यार्थिनींनी  संपूर्ण विविधतेत एकता असलेला भारत  व संस्कृतीचे दर्शन घडविले. त्यामध्ये महाराष्ट्र, कश्मीर, पंजाब, राजस्थान, आसाम, मिझोराम, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तराखंड अशा सर्व राज्यांमध्ये लोकप्रिय असलेले लोकनृत्यांचे सादरीकरण विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्टपणे केले. यासाठी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ  पाचडे यांनी केले तर आभार सौ  देशमुख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने पालक पालक वर्ग उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थिनींचा आनंद द्विगुणीत केला व उत्साह वाढविला. कार्यक्रमाला शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्वात शेवटी वंदे मातरम हे गीत सर्वांनी गायले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दिनांक 21 ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रांगणात त सर्व शिक्षकांनी संगीत- खुर्ची तसेच विद्यार्थ्यांसह गरबा खेळून आनंद लुटला. नंतर आरती म्हणून शारदा देवीचे विसर्जन करण्यात आले अशाप्रकारे शारदोत्सवाचा कार्यक्रम अति उत्साहात संपन्न झाला.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या