इंग्रजीच्या पेपर मधे आता No tension, Writting Skill साठी वापरा ही Methods....
विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर तुम्ही अभ्यासाचा सराव केला. सराव परीक्षेच्या काळात एक दिवसीय तालीम खेळलात आणि आता ऊद्या English चा पेपर आहे. तिन तासाचा पिक्चर दाखवायचा आहे. मर्यादित वेळेत Above 80% करायचे आव्हान आहे, तर पेपरात उत्तरांची अशी वापरा Shortcut methods.
Q.1 Language Study मधील कठीण वाटणारा प्रश्न म्हणजे Add a clouse, या कृतीचे विद्यार्थी चुकीचे उत्तर लिहून मार्क गमावितात. Clause लिहताना (Who शब्दाचा अपवाद सोडून इतर Wh- शब्दांचा वापर केल्यानंतर लगेचच कोणतेही क्रियापद वापरू नका. आधी कर्ता म्हणून नाम किया सर्वनाम लिहून नंतर क्रियापद लिहा. म्हणजेच Clause साठी विधानात्मक वाक्य लिहा प्रश्नार्थक नाही.
Q.4 मध्ये Summary लिहीताना Rejection- Selection Combination Substitution तंत्राचा वापर करा. ज्या विद्यार्थ्यांना Summary लिहिता येत नाही त्यांनी त्याच Passage वरील 04 A मध्ये दिलेल्या A2 या कृतीतील वाक्यांचा आधार घ्या. उत्तराची जागा कोणत्याही परिस्थितीत कोरी ठेवू नका, तुमचा Score कमी होईल. उताऱ्यामधील दिलेली उदाहरणे, वाक्यप्रचार, म्हणी, कथा काढून टाकावीत. आणि उरलेली वाक्य लिहून काढावीत.
Q.6 Information Transfer मध्ये Pie Chart करताना दिलेल्या प्रत्येक संख्येला ३.६ ने गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या अंशाचा कोन काढा. परंतु कोणाचे माप न लिहिता प्रश्नपत्रिकेत दिलेल्या संख्या लिहा. उदाहरणार्थ २५ संख्या दिलेली असल्यास २५ x ३.६ ९०. म्हणजेच ९० अंशाचा कोन काढा, परंतु त्या कोनामध्ये ९० संख्या लिहू नका, तर २५ ही संख्या लिहा. म्हणजे Pie Chart तंतोतंत बरोबर येईल. अंदाजे काढल्यास शेवटचा कोन चुकणार. तसेच जर टेबल भरावयास आल्यास त्यामधील महत्त्वाचे मुद्दे बघून लिहिण्याचा प्रयत्न करावा.
News Report तीन Features मध्ये लिहा. Headline दोन ओळीत मोठ्या अक्षरात उत्तरपत्रिकेच्या पानाच्या मध्यभागी लिहा. Dateline बारीक अक्षरात Headline च्या मध्यभागी लिहा. उर्वरित News तुमच्या Normal हस्ताक्षरात ३ परिच्छेदमध्ये एकूण ८० ते १०० शब्दांत लिहा. पहिला Paragraph मध्ये दोन तीन ओळीत Introduction, दुसऱ्या Paragraph मध्ये संपूर्ण Detail Information तर तिसऱ्या Paragraph मध्ये Concluding Line समारोपीय दोन ओळी लिहाव्यात. Speed वर लक्ष ठेवा प्रत्येक writing skill फक्त १५ मिनिटात पूर्ण करा व scoring वाढवा. Written Skill लिहिताना प्रश्नपत्रिका मधील दिलेल्या Points चा जसाचा तसा समावेश करावा. नक्कीच Writting Skill मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे Mark मिळवून इंग्रजी विषयातील भीती निघून जाईल आणि इंग्रजी विषयात आपले Scoring सुद्धा वाढेल.
BEST LUCK TO ALL STUDENTS
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या