मराठा महासंघाची आढावा बैठक -महानगर कार्यकारिणी पुनर्गठित
उद्योजक श्रीकांत सरोदे यांची महानगर अध्यक्षपदी नियुक्ती
अकोला दि.5: अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व केंद्रीय कार्यकारिणीच्या आदेशानुसार महासंघाची महानगर कार्यकारिणी पुनर्गठित करण्यात आली. रविवार दि.5 मार्च रोजी शासकीय विश्राम गृहात राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या अध्यक्षतेत अकोला जिल्हा व महानगर शाखेच्या झालेल्या संयुक्त बैठकीत शहरातील यशस्वी उद्योजक श्रीकांत सरोदे यांची अकोला महागराध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत प्रदीप लुगडे -सरचिटणीस, प्रफुल्ल देशमुख -कोषाध्यक्ष, उमेश सटवाले -संघटक तर उपाध्यक्ष म्हणुन राजेश देशमुख(वर वधू सूचक ),मोरेश्वर चौखंडे(संघटना विस्तार ), श्याम वाफदाणे(प्रचार प्रसार ), यांची नियुक्ती करण्यात आली. याच वेळी अमरावती विभागीय उपाध्यक्षपदी माजी जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, जिल्हा संघटकपदी घुसर येथील गणेश मनोहर शिंदे, म्हैसान्गचा तडफदार युवा अक्षय संतोष पिपरे याची अकोला तालुका अध्यक्षपदी तर सल्लागार मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी मधुकरराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने अकोला जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, महिला जिल्हा अध्यक्षा अनुराधा ठाकरे,वैध्यकीय कक्ष जिल्हा अध्यक्ष डॉ. श्रीकांत काळे, मावळते शहर अध्यक्ष संजय सूर्यवंशी, जि. सरचिटणीस शंतनू वसू, ज्ञानेश्वर गावंडे, महिला शहर अध्यक्ष कल्पना बिडवे, सह विविध कक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे तसेच केंद्रीय व विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद बैठकीचे नियोजन, अण्णासाहेब पाटील स्मृतिदिन निमित्याने कार्यक्रमाचे आयोजन, सभासद नोंदणी,आदी मुद्द्यांवर चर्चा यावेळी करण्यात आली.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी, संचलन दिपक ठाकरे यांनी तर आभार शिक्षक कक्ष जिल्हाध्यक्ष अरविंद नाकट यांनी मानले, असे प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात सोसिअल मीडिया जिल्हा प्रमुख सचिन पाटील गोमासे यांनी नमूद केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या