सरल पोर्टल वरील आधार कार्ड मिस मॅच विद्यार्थी invalid ठरवू नये
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेची शिक्षक आमदार किरणरावजी सरनाईक यांच्याकडे मागणी
अकोला (२६ फेब्रुवारी) गेल्या वर्षभरापासून सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची नोंदणी करण्याचे कार्य शाळा स्तरावर सुरू आहे. यामध्ये 90% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड सरल पोर्टल वर अपलोड झाले आहे. मात्र विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वरिल माहिती ज्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव,आडनाव जन्मतारीख यामध्ये एका शब्दाचा जरी तफावत असला तरी सरल पोर्टलवर सदर विद्यार्थी Invalid दाखवत आहे.
नुकतेच राज्याचे शिक्षण आयुक्त कार्यालयातील सहसंचालक साहेबांचे दिनांक 23 फेब्रुवारी 2023 च्या पत्रानुसार ज्या विद्यार्थ्यांचे सरल पोर्टल मधील माहिती व आधार कार्ड वरील माहिती जुळत नाहीत असे Mis-/Match असलेले विद्यार्थी Invalid ठरवले जाणार असुन सत्र 22-23 च्या संच मान्यतेसाठी ग्राह्य ठरवल्या जाणार नसल्याची सूचना पत्राद्वारे देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील हजारो शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आहेत.
त्यामुळे सरल पोर्टल वर आधार अपलोड केलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राह्य धरावे. Mismatch असलेले विद्यार्थ्यांना Invalid करू नये. याबाबत अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण राव सरनाईक साहेब यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. उद्यापासून राज्याची अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून, या अधिवेशनात सदर विषयावर शिक्षण मंत्री महोदयांशी बोलू हा विषय सभागृहात मांडण्याची आश्वासन शिक्षक आमदार माननीय किरणरावजी सरनाईक साहेबांनी दिले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनीष गावंडे उपाध्यक्ष अल्केश खेंडकर, सहसचिव अविनाश मते सहसचिव नरेंद्र चिमणकर जिल्हाध्यक्ष वसीम मुजाहिद, मोहम्मद शोएबुद्दीन जयसिंग मचले, गजानन पाडकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या