अखेर... विवरा येथील भोंदू बाबा वर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
महाराष्ट्र मेल न्युज नेटवर्क बातमीचा चा परिणाम
अंत्यविधी करिता स्मशानाकडे तिर्डीवरून मृतदेह नेत असताना मृतक उठून बसला, हे प्रकरण गावकऱ्यांसह सर्वांनाच अचंबित करणार होत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत संशय आल्याने प्रकरणाच्या मागचे रहस्य उलगडले. युवकाला जिवंत करण्याचा बनाव करणारा भोंदू तांत्रिक बाबाला आता पोलीसांनी गजाआड केले आहे. अकोला जिल्हयातील पातूर तालुक्यातील विवरा गावातील ही घटना आहे.
पोलीस स्टेशन चान्नीचे ठाणेदार योगेश वाघमारे हे 26 ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन चान्नी येथे हजर असतांना त्यांना गोपनिय बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, ग्राम विवरा येथे प्रशांत रामकृष्ण मेसरे, हा युवक मरण पावला आहे व त्याचे प्रेत अत्यंविधी करीता त्याचे नातेवाईक तिरडीवर घेवुन जात असतांना मांत्रिक आणि त्याला जिवंत करण्याचा दवा केला व प्रशांत मेसरेला माझे कडे घेवुन चला मी त्याला जिवंत करतो. तेव्हा प्रशांत मेसरे याचे नातेवाईक त्याला घेवुन परिया माता मंदीराकडे गेले व प्रशांतला जिवंत करण्याची प्रकीया सुरु झाली. प्रशांत मेसरे यास तांत्रिक दिपक उर्फ सागर गणेश बोरले याने काहीतरी तांत्रिक विधी करून जिवंत केल्याची चर्चा गावकऱ्यांमधे सुरू होती. ठाणेदार योगेश वाघमारे यांना हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटल्याने त्यांनी घटनास्थळी जावुन पाहीले असता ठीकाणी पुजेचे सामान व साहीत्य आढळुन आले. यावेळी ठाणेदार योगेश वाघमारे यांनी सत्यता पडताळणी करीता प्रशांत मेसरे याची वैद्यकीय अधिकारी प्राथमीक आरोग्य केंद्र चतारी येथे वैद्यकीय तपासणी केली. यामधे प्रशांत मेसरे हयाची प्रकृती चांगली आहे, असे सांगितले. तांत्रिक दिपक उर्फ सागर गणेश बोरले याने लोकांचे श्रध्देचा गैरफायदा घेवुन त्यांना अंधश्रद्धेच्या आहारी आणले. समाजामध्ये अंधश्रध्दा वाढविल्याचे काम केल्याचे सत्यता पडताळणी वरून निष्पन्न झाल्याने तांत्रिक दिपक उर्फ सागर गणेश बोरले याचे हे कृत्य कलम 505, भादवि सहकलम 3, महाराष्ट्र नरबळी आणि ईतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादु टोणा यांना प्रतिबंध कायद्याअंतर्गत व त्यांचे समुळ उच्चाटण करण्या बाबत अधिनियम 2013 प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी फिर्याद सरकार तर्फे फिर्याद देवुन गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू आहे. तसेच जनतेने कोणत्याही अफवांना व अंधश्रध्देला बळी पडु नये, असे आवाहन अकोला जिल्हयाचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी अकोला जिल्हयातील नागरीकांना केले आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राउत, उपविभागिय पोलीस अधिकारी बाळापुर गोकुल राज, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. योगेश वाघमारे, पोउपनिरीक्षक गणेश महाजन यांनी केली आहे. दरम्यान आरोपीस शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता ३० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
0 टिप्पण्या