Ticker

6/recent/ticker-posts

कचरा वेचणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणीक सहभाग

कचरा वेचणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणीक सहभाग


माणसाचे मोठेपण त्यांच्या शिक्षणात: प्रा. खडसे

शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असून, शाळाबाह्य मुलांना प्रथम शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यासोबतच त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याची खरी गरज आहे. स्नेहबंधन उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना आनंददायी शिक्षणाची पर्वणीच उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश योगेश पैठणकर यांनी केले.



           निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या संकल्पनेतून आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रम राबविला जात असून, यांतर्गत प्रभात किड्स स्कूल येथे स्नेहबंधन विद्यार्थी स्नेहमेळावा गुरुवार, १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम आणि कौतुक निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. संजय सेंगर, जिल्हा बालकल्याण अधिकारी विलास मसराळे, प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अनिता गुरव, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सूचिता पाटेकर, जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य राजेश देशमुख, प्रभातचे सचिव नीरज आवंडेकर, ज्येष्ठ पत्रकार अॅड. सुधाकर खुमकर, बालकल्याण समितीचे सदस्य डॉ. विनय दांदळे, बुलडाणा अर्बन बँकेचे संचालक अजय सेंगर प्रामुख्याने उपस्थित होते. माणसाचे मोठेपण त्यांच्या आर्थिक स्थितीत नसून, त्याच्या शिक्षणात दडलेले असते. गरिबीतूनही माणूस मोठा होऊ शकतो. 


प्रभातच्या आनंददायी शिक्षणाची प्रेरणा घेऊन विद्याथ्र्यांनी मोठी स्वप्ने पाहावी व ती स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र बाल हक्क आयोगाचे सदस्य संजय सेंगर यांनी मुक्त संवाद साधला व त्यांच्या मनातील उमेदीला व्यक्त होण्याची संधी दिली. जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सूचिता पाटेकर यांनीही त्यांच्याशी संवाद साधला आणि शिक्षणाचे महत्त्व विशद केले. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनीदेखील मार्गदर्शन केले. यापूर्वी बालकांसाठी विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगारंग आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालकांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांचे मेडल देऊन कौतूक करण्यात आले. यावेळी एसडीपीओ सुभाष दूधगावकर यांनीदेखील बालकांच्या स्नेहमिलनास भेट देऊन त्यांचे कौतुक केले. बालकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. सांस्कृतिक विभागाच्या संजीवनी अठराळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. क्रीडा विभागाच्या किरण बुंदेले, जया मुळे, मयूरी इंगळे, प्रशीक गोंडाणे, दिनेश आगाशे, श्रीकांत बुलबुले, प्रशांत तळोकार यांच्यासह प्रभातच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या