अकोल्यात भूकंपाचे सौम्या धक्के
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
अकोला : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अकोला शहरापासून २३ किमी अंतरावर बार्शीटाकळी परीसरात सायंकाळी ५.१८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती अकोला भूकंप वेधशाळेच्या अधिकाऱ्याने दिली. आतापर्यंत 3.5 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाल्याची माहिती नाही, असे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, अकोल्यात अशी घटना तिसऱ्यांदा घडली असून, याआधीही गेल्या वर्षी अकोल्याच्या आसपास अशा प्रकारचे दोन छोटे भूकंप आले होते.
अशा प्रकारचे सौम्य भूकंपाचे धक्के आज भारतामध्ये तीन ठिकाणे घडल्याच नॅशनल सेंटर ऑफ सीसमालोजी यांनी सांगितले. तसेच भारताबाहेरील नेपाळ या ठिकाणीसुद्धा भूकंपाचे सौम्य धक्के आज जाणवल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या