पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख निश्चित
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही 20 जुलै रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. यावर्षी सुद्धा 20 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार होती. या दृष्टीने परीक्षा परिषदेने डिसेंबर महिन्यात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सर्व पालक विद्यार्थ्यांचे परीक्षा कधी होईल याकडे लक्ष लागले होतो. आज ही प्रतीक्षा संपली असुन 20 जुलै तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला जोमाने सुरवात करायची आहे.
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या