कारंजा [लाड] : कारंजा तालुक्यातिल मौजे पोहा येथील मुळ रहिवाशी असलेले शेतकरी कुटूंबातील आणि पंचायंत समिती कारंजाचे माजी सदस्य असलेल्या स्व. बळीरामजी अवताडे यांचे सुपूत्र असलेल्या अकोला येथील पोलिस उपनिरिक्षक - राजुभाऊ अवताडे यांना नुकतेच दि.21/03/2022 रोजी महाराष्ट्र शासनाचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने त्यांच्या मुळ गावी पोहा सह कारंजा तालुक्यातील त्यांच्या मित्र मंडळींनी आनंद व्यक्त केला असून त्यांच्या परिवाराचे निकटवर्तीय संजय कडोळे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केलेले आहे . याबाबत राजुभाऊ अवताडे यांच्या संघर्षमय जीवनाबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, दि.08/04/1987 रोजी ते अकोला पोलीस दलात भरती झाले . सध्या ते जिल्हा विशेष शाखा अकोला येथे नेमणुकीस आहेत . नोकरीतील उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत त्यांना मा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडून दिनांक 17/ 8/ 2009 रोजी दोन ॲडव्हान्स इन्क्रिमेंट मंजूर झाले .
विदेशी नागरिकांच्या कामकाजाबाबत केंद्र सरकारचा आय व्ही एफ आर टी प्रोजेक्ट महाराष्ट्रात अकोला येथे प्रथम 100% यशस्वी केला . त्याबाबत मा पोलीस महासंचालक कार्यालयाकडून दिनांक 13 /4 /2015 रोजी त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले . दि .01/05/2016 रोजी मा पोलीस महासंचालक यांचे हस्ते त्यांना सन्मानचिन्ह मिळाले .अकोला येथे जिल्हा पासपोर्ट कार्यालय आणण्याकरिता त्यांनी सतत नव वर्ष पाठपुरावा करून महाराष्ट्रात प्रथम जिल्हा पासपोर्ट कार्यालय, पायलट प्रोजेक्ट एक करोड पंचवीस लाखाचा अकोला येथे मंजूर करून आणण्याबाबत पाठपुरावा केला . त्यासाठी मा गृह राज्यमंत्री यांचेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला . कार्यालय सुरू सुद्धा झाले तसेच सात विदेशी नागरिकांना विरुद्ध विसा नियमाचे उल्लंघन केल्याने कारवाई करून त्यांनी तीन विदेशी नागरिकांना भारतातून हद्दपार केले . तसेच दि. 31 जानेवारी 2022 रोजी मा पोलीस उपमहानिरीक्षक श्री चंद्रकिशोर मीना साहेबांनी त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला .आजपर्यंत त्यांना एकूण 407 अवार्ड मिळाले आहेत दि . 26 जानेवारी 2020 रोजी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते .सदर पदक दि .21/ 3/ 20 22 रोजी राजभवन मुंबई येथे महामहिम राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले असल्याचे वृत्त मिळालेले आहे .
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या