Ticker

6/recent/ticker-posts

ऍड.संतोष गोळे उपाध्यक्ष पदाकरीता अकोला बार असोसिएशनच्या निवडणूक मध्ये

ऍड.संतोष गोळे उपाध्यक्ष पदाकरीता अकोला बार असोसिएशनच्या निवडणूक मध्ये


अकोला बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये फायनल लिस्ट आज जाहीर करण्यात आली. यामध्ये अकोला बार असोसिएशनच्या निवडणूक रिंगणात अध्यक्ष, उपाध्यक्ष व सहसचिव पदाच्या निवडणुकीची फायनल लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत जाहीर झाली असुन उपाध्यक्षपदासाठी दुरंगी लढत निर्माण झाली आहे. त्यामुळे अध्यक्षपदापेक्षा उपाध्यक्षपदाची निवडणूक चर्चा जोमात दिसत आहे. कारण उपाध्यक्षपदासाठी दुरंगी लढत म्हणजे दोघांमधे आमना सामना बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये प्रथम एडवोकेट संतोष गोळे तर तर दुसरे शंकर ढोले अशी दुरंगी लढत अकोला बार असोसिएशनच्या निवडणुकीत बघावयास मिळत आहे. परंतु एडवोकेट संतोष गोळे यांची चर्चा फार जोमात आहे. एडवोकेट संतोष गोळे ज्येष्ठ वकील असून ते बारस असोसिएशन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


  प्रतिस्पर्धी काही वर्षांपूर्वी तिरंगी लढतीत पराभूत झालेला आहेत. त्यांचे विरोधात एड.खाडे निवडून आले होते.आता सरळ लढतीत काय होणार यावर  भविष्यातील पुढील राजकारण ठरणार आहे. ऍड.संतोष गोळे सीनिअर असून वादग्रस्त नाहीत. त्यामुळे गोळे यांचे निवडून येण्याचे संकेत दिसत आहेत. ते शांत स्वभावाचे असून कोर्टात त्यांचा कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद नाही त्यामुळे ते एक अनुभवी शांत व्यक्तिमत्त्व असून सर्वच वकिलांची पसंती त्यांनाच असल्याची दिसत आहे, असा गुप्त सुरू वकील मंडळी मध्ये दिसून येत आहे. निवडणुकीची तारीख 11 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक फार उत्सुकता निर्माण करणारी दिसत आहे. या निवडणुकीत जवळपास 1155 वकील मतदार आहेत. आता फक्त वाट आहे ती वकिलांचा कल नेमका कुणाकडे जातो.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या