दहीगाव गावंडे येथे प.पूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर..
प्रतिनिधी:-
दिनांक:- 7 डिसेंबर 2021
अकोला:-अकोला तालुक्यातील दहिगाव गावंडे येथे दिनांक 6 डिसेंबर रोजी दहिगांव गावंडे येथे परमपूज्य बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस आदरांजली म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजता वंदना घेऊन महामानवाला अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व तब्बल 70 रक्त दात्यांनी रक्तदान करून एक सामाजिक उपक्रम राबविला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन सुमेध खंडारे यांनी केले तसेच विशेष सहकार्य शैलेश पोहुरकर व अमित खंडारे यांनी दिले.कार्यक्रमाचे आयोजक नवयुवक एकता क्रीडा मंडळ तसेच 500 वॉरियर्स ग्रुप दहिगाव गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. हा नवनिर्वाचित असा सामाजिक उपक्रम दरवर्षी महामानवाला मानवंदना म्हणून घेण्यात येईल असा निर्धार दहिगाव गावंडे येथील युवकांनी पुढाकार घेऊन केला जाईल आणि मानवंदना देऊ न करू असा शेकडो नागरिकांनी निर्धार व्यक्त केला .

0 टिप्पण्या