Ticker

6/recent/ticker-posts

नवीन सुभेदार नागरी सहकारी. पतसंस्था अकोला शाखेचा चौथा वर्धापन दिवस साजरा

नवीन सुभेदार नागरी सहकारी.  पतसंस्था अकोला शाखेचा चौथा वर्धापन  दिवस साजरा



अकोला ः आपल्या समाजाची महाराष्ट्रातील सर्वात मोठी बारा शाखा असलेली नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपुर शाखा डाबकी रोड अकोला चवथा वर्धापन दिवस दिनांक 9 डिसेंबर 2021 गुरुवारला दुपारी बारा वाजता संस्थेच्या डाबकी रोड कार्यालय संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष श्रीराम मांडस्कर  उपस्थित होते पतसंस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री राम गव्हाळे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे  स्वागत केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात मध्ये संचालक प्रकाश देऊळकर यांनी अकोला शाखेची वार्षिक उलाढाल साडेपाच कोटी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष श्रीराम मांडस्कर यांनी संस्थेची स्थापना 3 मार्च १९८७ ला स्थापन झाल्यापासून आज पस्तीस वर्षात झालेल्या संपूर्ण घडामोडीचा आपल्या भाषणातून उलगडा केला.संस्था आर्थिक दृष्ट्या भक्कम असून दोनशे कोटी चे वर ठेवी असून एकूण सभासद संख्या 12236 आहे बँकिंगच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. बचत खाते, चालू खाते, आर.डी., पिग्मी खाते, अल्प मुदत ठेव योजना ,दीर्घ मुदत ठेव योजना, कर्ज योजना (७५ लाखापर्यंत) इतर गुंतवणूकीच्या लाभदायक योजना तसेच आरटीजीएस ,एन ई एफ टी, ऑनलाईन युपीआय, गुगल पे ,फोनपे तसेच एसएमएस सेवा उपलब्ध असून लवकरच एटीएम सेवा सुद्धा उपलब्ध  होत असल्याचे सांगितले .


उपस्थित सर्व सभासदांना सहकार्याची विनंती सुद्धा केली. अकोला शाखेचे माजी अध्यक्ष मधुकरराव   वानेडकर  यांनी संस्थेच्या प्रगतीस आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले . कार्यक्रमाला अमरावती शाखा संचालक अनिल भागवतकर ,संस्थेचे सभासद मेघशाम ठोसरे, निरंजन गव्हाळे ,श्री.प्रकाश चापके, श्रीराम राखोडे ,सारंगधर डाखोडे, गजानन काकडे, महादेवराव इंगळे, लक्ष्मणराव पद्मणे, काशीरामजी उंबरकर, तसेच संस्थेचे बहुसंख्य सभासद, खातेदार, ठेवीदार ,संस्थेचे कर्जदार, हितचिंतक कार्यक्रमास उपस्थित होते. आभार प्रदर्शन अकोला शाखा पालक संचालक श्री मधुसूदन गव्हाळे यांनी केले. सर्वांना नम्र विनंती केली की नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्था शाखा डाबकी रोड अकोला येथे भेट देऊन संस्थेस सहकार्य व मनोबल वाढविण्यासाठी मनिषा व्यक्त केली. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या