Ticker

6/recent/ticker-posts

लाभ पंचमी व श्रीराम जानकी विवाह सोहळा स्थानिक मोठे राम मंदिर येथे संपन्न

लाभ पंचमी व श्रीराम जानकी विवाह सोहळा स्थानिक मोठे राम मंदिर येथे संपन्न 


अकोला
लाभ पंचमी व श्रीराम जानकी विवाह सोहळा स्थानिक मोठे राम मंदिर येथे श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ व मातृशक्ती जागरण समितीच्यावतीने साजरा करण्यात आला यावेळी विशेष अनुष्ठान पूजा अर्चना तसेच महाआरती करण्यात आली दीपदान करून सर्वांच्या कल्याणाची कामना करण्यात आली. संताजी महाराज व गुरू तेग बहादुर सिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सेना दलाचे प्रमुख बिपिन रावत व 14 सेनाधिकारी यांच्या विमान दुर्घटना मध्ये निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली करण्यात आली. सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा प्रभू रामचंद्र हनुमान सीता यांच्या चरित्रावर प्रकाश टाकून दिशादर्शक तसेच भक्ती श्रद्धा सोबत संत तुळशीदास यांनी संसारातील असणारे सुख-दुख याचे सुरेख वर्णन व जीवन कसे जगावे याचे वर्णन केले आहे . 


जानकी माता यांच्या जीवन यांच्यावर सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले संत संत संताजी महाराज व गुरू तेग बहादुर सिंह यांचा त्याग बलिदान याबद्दल होता यांनी मार्गदर्शन केले तसेच सेना प्रमुख बिपिन रावत व सेनादलाच्या अधिकार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला  अकोलेकर वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. समितीचे अध्यक्ष विलास अनासने यांनी विशेष पूजा अर्चना सौभाग्यवती मनीषा अनासने यांच्यासोबत केली. यावेळी अनिल मानधने गिरीश जोशी, गिरीराज तिवारी, हेमंत शर्मा प्रवीण मानकर, पुष्पा वानखडे, संतोष शर्मा रेखा नालट, कल्पना अडचुले, नितीन जोशी, मीना राऊत, रेखा राऊत, ओम प्रकाश शर्मा , राधेश्याम शर्मा, घनश्याम शर्मा नितीन नंदकिशोर जोशी, विनय जोशी, चंद्रशेखर खडसे, विजय अग्रवाल, सोनल अगरवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या