Ticker

6/recent/ticker-posts

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१; मतदान पेट्या सुरक्षा कक्षात सिल

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१; मतदान पेट्या सुरक्षा कक्षात सिल



अकोला

महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणूक 2021 ची मतदानास सकाळी आठ वाजेपासून शांततेत प्रारंभ झाला. निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज मतदान केंद्रावर भेट देवून पाहणी केली.


 आज सकाळी डॉ. पांढरपट्टे यांनी अकोला तहसिलअंतर्गत असलेल्या बी. आर. हायस्कूल येथील मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी मतदान केंद्रावरील सोईसुविधा, सुरक्षा व मतदान प्रक्रियेची माहिती मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडून जाणून घेतल्या.


विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१; मतदान पेट्या सुरक्षा कक्षात सिल करण्यात आल्या,  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आणि इतर अधिकार्यांच्या उपस्थितीत सर्व मतदान पाट्यांना सुरक्षा कक्षात सिल करण्यात आले.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या