Ticker

6/recent/ticker-posts

परिचारिका संघटनेचे काळ्या फिती लावून आंदोलन

परिचारिका संघटनेचे काळ्या फिती लावून आंदोलन


अहमदनगर रुग्णालय अग्नीतांडव प्रकरण : १५ नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन

प्रतीनीधी, अकोला-
अहमदनगर येथील रुग्णालयातील आगीच्या प्रकरणात परिचारीकांना निलंबन करून त्यांची सेवा समाप्ती केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आज काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनेची जबाबदारी म्हणून आपत्कालीन परिस्थितीम ध्ये जिवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठीधडपड करणाऱ्या २ परिचारीकेवर निलंबन तर २ परिचारिकांच्या सेवा समाप्तीची कार्यवाही करून प्रशासन व शासनाने अत्यंत अम अनुषता दाखविली आहे.


या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेने राज्यस्तरीय आंदोलन सुरू केले आहे. यानिमित्ताने १४ नोव्हेंबरपर्यंत काळ्या फिती व निदर्शने करून आंदोलन करण्यात येणार आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत १५ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकारने ही कारवाई मागे घ्यावी, अशी मागणीही केली आहे.

आज आंदोलनाचा दुसर्‍या दिवशीही, काळ्या फिती लावून केले कामबंद आंदोलन 



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या