Ticker

6/recent/ticker-posts

निसर्गोपचारामुळे आपले डाॅक्टर आपण होऊ शकता -डाॅ.गोवर्धनदादा खवले

निसर्गोपचारामुळे आपले डाॅक्टर आपण होऊ शकता -डाॅ.गोवर्धनदादा खवले


जागतिक निसर्गोपचार दिन संपन्न


अकोला—निसर्ग हा मानवी आरोग्याचा खजिना आहे.सुदृढ आरोग्यासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करुन  आपले डाॅक्टर आपण व्हा असा सल्ला वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष डाॅ.गोवर्धनदादा खवले यांनी दिला..   


             जागतिक निसर्गोपचार दिनानिमित्त वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आरोग्य मंदिर प्रोफेसर काॅलनी येथे आयोजित योगाभ्यास वर्गाचे उद् घाटन प्रसंगी बोलत होते.ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  होते.
निसर्गोपचार ही कमीतकमी खर्चाची,सहजसाध्य अशी उपचार पद्धती आहे.याचा प्रचार प्रसार होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डाॅ.गोवर्धनदादा खवले यांनी याप्रसंगी केले.
योगप्रचारक चंद्रकांतजी अवचार यांचा योग प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल याप्रसंगी शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कृषी किर्तनकार महादेवराव भुईभार यांनी निसर्गोपचार ही आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. प्रत्येकाने निसर्गोपचारासोबतच निसर्ग संवर्धन करण्याचे आवाहन अध्यक्षीय भाषणातुन केले.योगशिक्षक चंद्रकांतजी अवचार यांनी याप्रसंगी योगासन व प्रानायम प्रात्यक्षिके सादर केली.दररोज सकाळी६.३० ते ७.३० दरम्यान योगा व प्रानायाम प्रशिक्षण वर्ग संपन्न होणार आहे.परिसरातील महिलांसाठी विशेष बॅच असल्याचे जाहीर करण्यात आले.
राष्ट्रधर्म युवा संघटनेचे राष्ट्रीयअध्यक्ष डाॅ.रामेश्वरदादा बरगट ,डाॅ. हिरासिंह ठाकुर ,बबनराव कानकिरड,विलास ठाकरे,लतिका ठाकरे,राजबहादूरसिंह जयवार,हर्षा सचिन गिरी,शारदा अहीर,आकाश पाटील, शिवाजी चव्हाण, दीगंबर बोचरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन आकाश इंगळे यांनी केले.सौ. संगीता नवले यांनी आभारप्रदर्शन केले.
राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या