*शहीद भूमी शिरला येथे सैनिकांसोबत दिवाळी*
सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ शिरला अंधारे व शहीद कैलास निमकंडे स्मारक समिती यांचे संयुक्त विद्यमाने आजी-माजी सैनिकासोबत दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रम शहीद कैलास निमकंडे यांच्या शिरला अंधारे या जन्म गावी आयोजित केला होता. हे कार्यक्रमाचे दुसरे वर्ष असून उपस्थित माजीसैनिक आणि कार्यरत सैनिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून सोमपुरी महाराज जेष्ठ नागरिक संघ शिरला यांचे अभिनंदन केले व आपण केलेले आमचा सत्कार आमच्या कायम समरणात राहील असे भावपूर्ण उद्गार काढलेत. कार्यक्रमाची सुरुवात शहीद कैलास निमकंडे यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह .भ. प .महादेव निमकंडे महाराज यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अंधारे यांनी केले .
योगाचार्य भगवंतराव गावंडे आसलगाव यांनी देशभक्तीपर स्वरचित पोवाडा गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये एन एन बटालियनचे सी ओ चंदप्रकाश भदोल,सुभेदार मेजर अशोक कुमार, अमर जवान माजीसैनिक संघटनेचे अध्यक्ष माजीसैनिक सुभाषराव म्हैसने पाटील,त्रिदल माजी सैनिक संघटनेचे संतोष चराटे, उप सरपंच कल्पनाताई खर्डे,प्रा. यादवराव वक्ते, फेसकॉमचे अतिरिक्त मुख्य सचिव विनायक पांडे ,साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ उमरी चे अध्यक्ष ना.मा.मोहोड गुरुजी, विठ्ठल रुक्मिणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गोमासे , श्री सोंमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायणराव अंधारे सचिव श्रीकृष्ण अंधारे वीरपिता काशीराम नीमकंडे, वीरमाता मंदाताई निमकंर्डे, वीरपिता शत्रुघ्न गवई, वीरपिता वामनराव गवई, संजय राऊत, माजी सैनिक संघटनेचे तुकाराम निलखन, देविदास निमकंडे,प्रा. विलास राऊत , पांडुरंग वरणकर गुरुजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व वीरमाता-वीरपित्यांचा व माजीसैनिक व कार्यरत सैनिक यांचा सत्कार करण्यात आला .यामध्ये शिवशंकर चिकटे, संतोष च, माजीसैनिक देविदास काजगे,मंगेश राऊत, मुरलीधर झटाले , अनिल अंधारे, अनंता वसतकार संतोष बंड,दिनेश कठाळे, संजय ढाळे, गौतम इंगळे शंकर देशमुख,रुपेश रीधोरकर, प्रशांत निलखन, अशोक दबालकर, शिवशंकर चिकटे, दीपक गाडगे , दिगंबर घाडगे, अर्जुन बुधनेर, रवींद्र श्रीनाथ, शैलेश सिंह बायस, अरुण राऊत , वसंता बंड इत्यादी चा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कु.अक्षता गजानन ताले हिने तसेच कर्नल भादोला ,विनायकराव पाण्डे, देविदास काजगे, संतोष चराटे , शंकरराव चिकटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा .विलास राऊत यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे रामकृष्ण खंडारे, हरिभाऊ कठाळे, सौ मिराबाई राऊत ,रामदास सावरकर ,देवनाथ बगाडे, पुडलिक निलखन, देविदास निमकर्डे, बंडू गाडगे, पांडुरंग हिरळकार राजू भाऊ कोकाटे,गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अनंता अंधारे मंगेश निमकर्डे तुळसाबाई कावल विद्यालय येथील प्रा. सुभाष इंगळे व एनसीसीचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या