सासूही आई होवू शकते!!!!
अलीकडे आई वडील मुलीच्या विवाह प्रसंग आला की, विचारुन सांगतो वगैरेंची भाषा बोलून मोकळे होतात. शेवटच्या क्षणी आमच्या बरोबरीचे कींवा मुलगी लग्नाची पाहिजे वगैरेंची बोललात .मात्र गेल्या तीन वर्षाच्या आधी पार्वती नगरातील
स्व. धनंजय बाहेकर यांच्या हुदयविकाराने मुत्यू झाला, सासू ला सुनेवर आलेल्या संकटातून बाहेर कसे काढावे कारण आपल्या सूनेला माहेर नाही. संपूर्ण आयुष्य दोन लहान मुले यांचा विचार करत सरळ त्या सुनेला दुसऱ्या विवाह करून देण्याचे बाबतीत समाजाचे अध्यक्ष म्हणून श्री मावळे यांच्या सोबत चर्चा ही केली. त्या प्रमाणे श्री मावळे यांनी पुढाकार घेऊन दोन तीन स्थान दाखवले,पण होते स्वातीला आधीच दोन मुले आहेत. अशा अवस्थेत मुळचे लोणी चे पेठकर कुटूंब पुढे आले, आणी स्वातीला पंसत केले.
एक प्रयत्न करीत दोन्ही कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन विवाहया विचारावर येऊन थाबंले. महेंद्र मधुकर पेठकर हे मुळचे लोणी या गावचे परंतु नौकरी निमित्ताने ते खामगाव येथे स्थायीक झाले.
आज स्वातीला पहिली सासु लताबाई पुरणसा बाहेकर एक आईची भुमीका घेत तिचा पुनः विवाह भावसार पंच बंगल्यात अगदी मोजक्या पाहुणे म्हणून सुनेला बिदागी करण्यासाठी सकाळी अकरा वाजता हिंगलाज माता मंदिर, भावसार पंच बंगला येथे हार फराळ करून हा विवाह संपन्न होणार आहे .ही भावसार समाजात एक आदर्श विवाह ठरावा दोन्ही परीवाराचे सदस्य या सोहळ्याचे निमित्ताने अभिनंदनास पात्र आहेत. भावसार क्षत्रिय समाज पंच कमेटी.अकोला जिल्हा भावसार समाज विदर्भ भावसार समाज तथा विदर्भ भावसार वधुवर परीचय समुहाचे वतीने दोन्ही उभयतांना माता हिंगलाज भरपूर आशीर्वाद प्रदान करोत ही प्रार्थना.
0 टिप्पण्या