जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा परिषद समोर नमस्कार आंदोलन करण्याचा इशारा
जागतिक अपंग दिनानिमित्त कोरोना योध्द्यांचा सत्कार,व दिव्यांग कर्मचारी/शिक्षक यांच्या मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर नमस्कार आंदोलन करण्याचा इशारा. आज दिनांक दि.२२/११/२०२१ रविवार ठीक १.००वा. संघटनेचे कार्यालयात सभा घेण्यात आली, खालील विषयावर चर्चा करण्यात आली
👉 *सभेतील विषय क्रमांक २,३ दिव्यांग कर्मचारी/शिक्षक यांची दि.७/२/१९९६ पासून पदाची परिगणना करून पदोन्नती करणे. पदोन्नती साठी दिव्यांगांच्या पदनिहाय अपंग प्रमाणपत्राचे दिनांकानुसार सेवाज्येष्ठता यादी तयार करणे.तसेच दिव्यांग शिक्षक/कर्मचारी यांना उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार व शासननिर्णय सामाजिक न्याय विभाग दि.//२०२१ नुसार सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे. उदा- अस्थिव्यंग शिक्षक/कर्मचारी यांना टू व्हीलर मोटरसायकल+ ॲडप्शन कर्णबधिरांना श्रवणयंत्र, अंध/अल्पदृष्टी यांना बोलके संगणक उपलब्ध करून देण्यासाठी १.०० लाख रुपये.प्रती तंत्रज्ञान उपकरणे खरेदी करण्यासाठी देणे बंधनकारक आहे. याबाबतीत मा. मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब जि.प. अकोला. यांना निवेदन दिलेले आहे. आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक, यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी पत्र काढले. दिव्यांग शिक्षक/कर्मचारी यांना जर सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे ३ डिसेंबर २०२१ पर्यंत पुरवण्यासाठी निधीची तरतूद केली नाही.तर जागतिक अपंग दिनी संघटनेचे वतीने जि.प.समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी अकोला. यांना भेटून दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग बेरोजगार बंधू-भगिनीं यांच्या समस्या बाबतीत निवेदन दिलेले आहे.त्यावर चर्चा झाली.*
👉 *तसेच दिव्यांग शिक्षक/कर्मचारी यांना जुन्या पेन्शन योजनेसाठी कोर्टात केस टाकण्यासाठी नागपूर हायकोर्टाचे वकीलांशी चर्चा झाली. यांची भेट घेण्यासाठी नागपुरला जायचं ठरलं.*
👉 *शासकीय - निमशासकीय दिव्यांग कर्मचारी/अधिकारी पतसंस्था मर्यादित अकोला चे रजिस्ट्रेशन करण्याबाबत चर्चा झाली*.
👉 *जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था र.न.१०८ अकोला ची निवडणूक समविचारी संघटना सोबत युती करून लढण्यावर, आजच्या सभेत एकमताने निर्णय घेण्यात आला.*.
👉 *जागतिक अपंग दिन महोत्सव ३डिसेंबर कोविड- १९ चे नियमाचे पालन करून साजरा करण्याबाबत एकमताने निर्णय झाला. या दिवशी कोरोना कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणारे कोरोना योध्दा व गुणवंत विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक, खेळाडू, शेतकरी, व्यावसायिक, पत्रकार मंडळी सेवानिवृत्त कर्मचारी, समाजसेवक यांचा राज्यस्तरीय गुणगौरव/ सत्कार करण्यात ठरले. कोरोना ने मृत्यू झालेल्या दिव्यांग बांधवांच्या कुटूंबियांना मदत करण्याचे ठरले.त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील व्यक्तींची नांव गोळा करण्याचे ठरले*.
👉 *संघटनेत तन, मन धनाने,काम करण्यासाठी ज्ञानेश्वर माकोडे, जिल्हा उपाध्यक्ष माध्यमिक शिक्षण विभाग. शहाबुद्दीन मो.निजाम अकोला तालुका उपाध्यक्ष, रामेश्वर कवळे पातूर तालुका उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली*.
👉 *नवनियुक्त म.न.पा. आयुक्त,व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचा सत्कार करण्याचे ठरले*
👉 *यांसह विविध विषयावर चर्चा झाली व निर्णय घेण्यात आले सभेच्या अध्यक्षस्थानी संजय बरडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना अकोला हे होते.सभेतील विषय वाचन सचिव मो.अ.अजीज यांनी केले. सुत्रसंचलन दिलीप सरदार यांनी केले, सभेला संजय बरडे,मो.अ.अजीज, अविनाश वडतकर, दिलीप सरदार, रविंद्र देशमुख , राजेश रौदळे यांनी मार्गदर्शन केले.व आभारप्रदर्शन रविंद्र सिरसाठ यांनी केले सभेला जावेद इक्बाल, प्रमोद पोके , मनोज जयस्वाल,श्याम हिंगणकर, प्रविण फुले, सोहेल परवेज अली,विकार परवेज, सुनिल वानखडे, गणेश महल्ले, नितीन गुगळे,कु.माधुरी देठे,निलीमा आमले, उज्वला शर्मा, शबाना पटेल, शितल नैताम, वंदना चौधरी, ओमप्रकाश बरेठी, मिलिंद गोतरकर, ज्ञानेश्वर माकोडे, नरेंद्र इंगळकर, शहाबुद्दीन मो.निजाम,अजमत उल्ला खान, मीरा कराड,अर्चना अढाऊ,सुदेष्णा पजई, ज्योती दातीर,दिपक वाघमारे,मो.वसिम, सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.♿*
0 टिप्पण्या