Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील शाळांना दिनांक २८.१०.२०२१ ते दिनांक ११.११.२०२१ पर्यंत दिवाळी सणाच्या सुट्ट्या जाहीर


राज्यातील शाळांना दिनांक २८.१०.२०२१ ते दिनांक ११.११.२०२१ पर्यंत दिवाळी सणाच्या सुट्ट्या जाहीर 



महाराष्ट्र शासन नवीन दुरूस्ती निर्णय जाहीर



१.कोव्हीड- १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा दिनांक ०४/१०/२०२१ पासून ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांना विविध धार्मिक सण / उत्सवांकरीता सुट्टया घोषित करण्यात येत असतात.

२.सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना

दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत

आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरू असलेले

अध्यापनाचे कामकाज बंद राहील.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२११०२७१३०४५३२०२१ असा आहे. हे परिपत्रक


डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या