Ticker

6/recent/ticker-posts

मराठी विषयाला सीईटी न्याय मिळेलका?

मराठी विषयाला सीईटी मधे न्याय मिळेल का?



 अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यात स्वतंत्र सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दहावीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या चार विषयांची असणार आहे. यात मात्र मराठी विषय नसल्याने मराठी भाषेला का डावलण्यात येत आहे? कळत नाही. कोरोना महामारी मुळे सर्वांचेच आरोग्य संकटात आले आहे त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बोर्डची परीक्षा रद्द करण्यात आली. आणि निकाल शिक्षकांच्या मदतीने अंतर्गत मूल्यमापन करून जाहीर करण्यात येणार आहे. पण अकारावी प्रवेशासाठी मात्र सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य हवे असल्यास विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. असे जाहीर झाले आहे. माध्यमीक शालांत परिक्षेचा निकाल लागला असुन , सीईटी परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदन भरने सुरू झाला आहे• परिक्षची तारीख सुध्दा जाहीर झाली आहे• परंतु अजुन पर्यंत मराठी विषयात सीईटी मधे न्याय मिळालेला नाही• मराठी प्रेमी अजुनही काही पर्याय उपलब्ध करून देण्याच्या प्रतीक्षित आहेत•



सीईटी परीक्षेसाठी निवडलेल्या चार विषयांमध्ये मराठी विषयाचा समावेश असावा किंवा पर्याय उपलब्ध करून देऊन मराठी विषयाला न्याय मिळवून द्यावा. शिक्षण विभाग व राज्य सरकारच्या या निर्णयाला मराठी भाषीक तीव्र विरोध करीत आहेत. मराठी विषयाला डावलून आपण आपल्या राज्य भाषेचा अपमान करीत आहोत. या परीक्षेत मराठी विषय नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. एसएससी बोर्डाने चार विषयांमध्ये मराठी भाषेचा समावेश का केला नाही? आणि याचा परिणाम सीईटी परीक्षेवर काय होऊ शकतो? अशा प्रश्न निर्माण होत आहे. विद्यार्थांचे ऑनलाईन शिक्षणामुळे पाहीजे त्या प्रमाणात शिक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे विद्यार्थी प्रत्तेक विषयात मागे पडली आहेत. अकरावी प्रवेशासाठी सीईटी हा पर्याय योग्य ठरत आहे, परंतु त्या परीक्षेमधे सर्वच विषयांचा समावेश असायला हवा. जनेकरून विद्यार्थी सर्वच विषयांचा अभ्यास करतील आणि त्यांच्या बौध्दीक क्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. शासनाला विनंती आहे की बाकी विषया बरोबरच मराठी भाषेचा सीईटी मधे समावेश करून, मराठी भाषेचा सम्मान वाढवावा.



*लेखक प्रा. प्रज्ञानंद थोरात*
अकोला


अकोला डेली मेल
 मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Vilas Ingle म्हणाले…
मराठी भाषा विषय परिक्षा घेतली पाहिजे.