Ticker

6/recent/ticker-posts

गुरु हे जीवनाचे पथप्रदर्शक असतात

गुरु हे जीवनाचे पथप्रदर्शक असतात


 अकोला-- गुरु हे शिष्याच्या जीवनात अनेक वाटा निर्माण करतात. त्याच्या शाश्वत सुखाची अभिलाषा बाळगतात. गुरूच्या सानिध्यात शिष्याच्या जीवनाचे फलित होत असल्याचे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सांगितल्या जात आहे.याच प्रचीतीमुळे जिल्ह्यातील जेष्ठ धर्माभिमानी तथा अखिल भारतीय हिंदू सेनाप्रमुख धर्मवीर चंद्रशेखर गाडगिळ यांच्या शिष्यांनी आज गुरुपौर्णिमेच्या पर्वावर त्यांचे पादप्रक्षालन करून आशीर्वाद प्राप्त केला. अ.भा.हिंदू सेनेचे तमाम शिष्य गुरु पौर्णिमेच्या पर्वावर ज्येष्ठ गुरु गाडगीळ यांच्या आदर्श कॉलनी येथील निवासस्थानी जाऊन त्यांची वार्षिक पूजा करून आशीर्वाद प्राप्त केला. दरवर्षी गुरु गाडगीळ यांचे शिष्यगण गुरु पौर्णिमेचा हा उत्सव त्यांच्या निवासस्थानी साजरा करतात. यावर्षीही पारंपारिक रित्या हा उत्सव शिष्यांनी साजरा केला. या वेळी हिंदू सेनेचे ज्येष्ठ सदस्य व वृत्तपत्र विक्रेता संघाचे पदाधिकारी अरुण गुजर, हिंदू सेनेचे शहर प्रमुख पवन शर्मा, रुद्रावतार हनुमान मंदिराचे अध्यक्ष व गुरुचे शिष्य अशोक परळीकर, नरेश गुलाहे, निरंजन हेडोले,प्रमोद मोहरील, रवी वाघाळकर, आनंद सदनशिव, अतुल बोराळकर, सुरज अलोट, विजय जोहारले आदींनी गुरूंच्या निवासस्थानी हजेरी लावून हा उत्सव गुरुच्या  सत्संगात साजरा केला.



अकोला डेली मेल 
मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या