Ticker

6/recent/ticker-posts

अकोला मधिल पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत करावी

अकोला मधिल पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी



अकोला परिसरातील पुरग्रस्तांचे सर्वेक्षण करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी व अन्नधान्याचा पुरवठा करावा व पडझड झालेली घरे शासनाने त्वरीत बांधून द्यावी, असी मागणी वंचीत बहुजन आघाडी तर्फे करण्यात येत आहे•



दि. 21 जुलै रोजी रात्रीला रात्रदिवस पाऊस झाल्यामुळे मोर्णा नदीला महापुरआला असून अकोला महानगरातील पंचशिल नगर, यशवंतनगर, अंबिका नगर, रमाबाई आंबेडकर नगर, हरिहर पेठ, अकोली बु।।, गुलजार पुरा, खैर मोहम्मद प्लॉट, शरीफ नगर, नेहरू नगर, इत्यादी परिसरामध्ये पुरामुळे हजारो घरे उध्वस्त झाली. या परिसरातील सर्व नागरिक सैरावैरा जुल्फुकार नगर, आर.पी.टा.एस. रोड, जेतवन नगर खदान, कवाडे नगर, निमवाडी यासह झाले व हवालदिल झाले. त्यांचे दुःख व झालेले नुकसानाची पाहणी करण्याकरिता श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडी अकोला महानगरातील पदाधिकारी यांनी पाहणी केली. पुरामुळे नागरिकांचे संपुर्ण घराची पडझड झाली, काही घरे भुईसपाट झाली. घरातील अन्नधान्य भिजून गेली व संसार उपयोगी साहित्य पुर्णपणे या पुरात वाहून गेली आहे. त्याकरिता शासनाने ताबडतोब अकोला शहरातील सर्व पुरग्रस्तांचा सर्वेक्षण करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी व अन्नधान्याचा पुरवठा करावा व पडझड झालेली घरे शासनाने त्वरीत बांधून देण्यात यावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या पुरग्रस्तांना न्याय मिळवून देण्याकरिता तिव्र आंदोलन छेडल.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या