Ticker

6/recent/ticker-posts

अखेर अकोला महापालिकेला मिळाले नवीन आयुक्त* *अकोला महानगर पालिका आयुक्तपदी गोविंद बोडके यांची नियुक्ती*


अखेर अकोला महापालिकेला मिळाले नवीन आयुक्त

अकोला महानगर पालिका आयुक्तपदी गोविंद बोडके यांची नियुक्ती




अकोला : अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त पदी कोण विराजमान होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला अखेरअकोला महानगर पालिका आयुक्तपदी गोविंद बोडके यांची नियुक्ती करण्यात आली असुन जितेंद्र पापळकर यांची हिंगोली जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण येथील सहव्यवस्थापकीय संचालक जी.एम.बोडके यांची अगोदर परभणी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली होती.मात्र पापळकर यांनी मनपा आयुक्तपदाचा पदभार घेतला नाही.आज शासनाने प्रशासकीय बदल्या करतांना बोडके यांची महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती केली.


जितेंन्द्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी


अकोला मनपा आयुक्तपदावर बदली झाल्यानंतर पदभार घेण्यास स्पष्ट नकार देत, रजेवर गेलेले जितेंद्र पापळकर यांची आज ३० जुलैला हिंगोली जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.राज्य शासनाकडून १२ जुलैला अकोला मनपा आयुक्तपदावर नियुक्ती केल्याचे आदेश आल्यावर १३ जुलैला जिल्हाधिकारी पापळकर यांनी मुबंईगाठून वरिष्ठ अधिकारी व संबंधिताची भेट घेत अकोला मनपा आयुक्तपदाचा पदभार घेण्यास नकार दिला.अकोला मनपा आयुक्त सोडून इतरत्र नियुक्ती मान्य असल्याचे पापळकर यांनी वरिष्ठ अधिका-यांना सांगीतले.अकोला मनपा ‘ड’ श्रेणीत असुन थेट जिल्हाधिकारीपदा वरून येथे होणारी नियुक्ती मान्य करणे शक्यच नव्हते.मुबंई येथून परत आल्यावर जिल्हाधिकारी पापळकर यांनी १४ जुलैला नीमा अरोरा यांना जिल्हाधिकारीपदाची सुत्रे सोपवली होती. आज ३० जुलैला हिंगोली जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली.




अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या