बाळापुर तालुक्यामधील ग्राम हातरुण येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ विद्यालयातील अकोला येथील जी एम सी रुग्णालयातील शिक्षकांची आर टी पी सी आर तपासणी झाल्यानंतर या विद्यालयातील शिक्षक कोरोना बाधित असल्यांचे आढळुन आले आहेत त्यांची कोरोना पॉझिटिव्ह ची बातमी गावात पसरतात गाव व परिसरात विद्यार्थी सह पालक तथा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या शाळेत शिंगोली मालवाडा बोरगाव वैराळे लोणाग्रा धामणा आधी गावचे मुला मुली या शाळेत शिक्षण घेतात या शाळेत मागील दोन महिन्यापूर्वी एका कर्मचारीचां कोरोना मुळे मृत्यू झाला होता या शाळेत आणखी एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे या दृष्टिकोनातून हातरुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र च्या टिमच्या पथकाने आज दिनांक ,26 7 2021 सोमवारी रोजी महात्मा गांधी विद्यालयतील सर्व शिक्षक कर्मचारी व मुलामुलींचे आर टि पि सी आर तपासणी करण्यात आली शिक्षक व कर्मचारी 25 मुला मुली 85 एकूण एकशे दहा चे आर पि पि सी आर करण्यात आले येथील आरोग्य केंद्राचे एमटी कांते आरोग्य सेवक एच आर कानपूर आरोग्य सेवक जे बी वझे सफाई कामगार दीपक बारसे या कर्मचाऱ्यांचे हातून आर पि पि सी आर करण्यात आले आहे याकडे शिक्षण विभाग काय भूमिका घेतात शाळा बंद किंवा सुरू ठेवतात या कळे पालकांचे लक्ष लागलेले आहे.
0 टिप्पण्या