पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई प्रतिष्ठान पुणे चा राष्ट्र सेवा पुरस्कार संदीप देशमुख यांना जाहिर
अकोला : येथील तरुणाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शुभम साहित्य मंडळाचे सचिव साप्ताहिक वऱ्हाड नामा चे संपादक समाजसेवक पत्रकार श्री संदीप देशमुख यांना डॉ.पद्मश्री मनिभाई देसाई प्रतिष्ठान पुणे चा राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर झाला असून निवड झाल्याचे पत्र प्राप्त झाले. त्यांना तो येत्या रविवार 27 एप्रिल 25 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
तरुणाई फाउंडेशन कुटासाच्या माध्यमातून सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक कला पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संदीप देशमुख अकोला जिल्ह्यातील साहित्य वर्तुळात सुप्रसिद्ध साहित्य सेवक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत तरुणाई फाउंडेशन च्या माध्यमातून अकोला जिल्हास्तरीय साहित्य संमेलने तसेच राज्यस्तरीय साहित्य संमेलने घेऊन नवोदि त तथा ज्येष्ठ साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. मागील तेरा वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक युवती ना स्वामी विवेकानंदयुवा पुरस्काराच्या माध्यमातून ते आपल्या संस्थेच्या सन्मानित करतात संदीप देशमुख यांना आतापर्यंत विविध संघटनेच्या तसेचसंस्थेच्या वतीने विविध पुरस्कार मिळालेले असून त्यांना या आधी विस पुरस्कार मिळाले आहे. या ऐकविसाव्या पुरसकाराचे श्रेय ते आपले साहित्यिक मित्र अंकुर साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश दाहेलकर यांना आणि डॉक्टर पद्मश्री माने भाई देसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार , हभप डॉ. रवींद्रजी भोळे यांना दिले
0 टिप्पण्या