अकोल्यातील पहलगामला गेलेले पर्यटक सुखरूप, आ. साजीद खान यानी केली हल्याची निंदा
अकोल्यातून काश्मीरमधील पहलगाममध्ये गेलेले 16 पर्यटक सुखरूप असून सोनमर्ग मार्गे श्रीनगरमध्ये सर्व पर्यटक सुखरूप पोहोचले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तर पहलगाममध्ये नि:शस्त्र पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी हा मानवतेवर आणि देशाच्या एकतेवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त करत जखमी लवकर बरे होण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
_*जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अकोला दूरध्वनी क्र.0724-2424444*_
- काश्मिर मधील पहलगाम येथे आज दहशतवादी हल्ला झाला असून सदर ठिकाणी जिल्ह्यातील पर्यटक अडकले असल्यास श्रीनगर येथील संपर्क क्रमाक पुढीलप्रमाने आहेत,
Contact details :
A) 0194-2483651
0194-2457543
B) WhatsApp Nos.
*7780805144
*7780938397
तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अकोला दूरध्वनी क्र.0724-2424444 आहे,सदर ठिकाणी अकोला जिल्ह्यातील कोणी नागरिक असल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा .
0 टिप्पण्या