Ticker

6/recent/ticker-posts

पार्थ पवार यांच्या उदंड आयुष्यासाठी अकोल्यात दुग्धअभिषेक

पार्थ पवार यांच्या उदंड आयुष्यासाठी अकोल्यात दुग्धअभिषेक 


अकोला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवस आज अकोला शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला ग्रामीण तर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या नेतृत्वात आज सर्वप्रथम अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज मंदिरात पार्थ पवार यांच्या उदंड आयुष्यासाठी दुग्धअभिषेक करण्यात आले. या पक्षात जिल्हास्तरीय रुग्णालय येथील रुग्णांना जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत फळ तसेच बिस्कीट वाटपाचे आयोजन करण्यात आले, यावेळी शेकडोच्या संख्येत गोरगरीब रुग्णांना फळ व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीण च्या मुख्य कार्यालयात जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे तसेच संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जोरदार आतिषबाजी करीत पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले. पार्थ पवार यांचा वाढदिवस हा संपूर्ण सप्ताह विविध कार्यक्रमांच्या स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कृष्णा अंधारे यांनी दिली, यावेळी राम अमानकर, गजानन पाटील, सुरेश रामेकर, बाळासाहेब तायडे, गजानन खरात, ज्ञानू टाले पाटेकर, लश्मन खंडारे, जगन्नाथ पाटील, बळीराम रोडे, रोहन काकड, शुभम पाचपोर, मंगेश भगत, गणेश राठोड, सोपान पाचपोर, निखिल गावंडे, गजानन पाचपोर, वासुदेव जाधव, दीपक पाटील, माधुरी वाघमारे, राधिका मेटांगे, उज्वला बावस्कर, रंजना रमेकर, रश्मी पाटेकर, विनोद थोटे यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या