Ticker

6/recent/ticker-posts

14 ऑकटोबर 2024या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन नोकर भरतीला स्थगिती द्यावी री पां ई चे बुद्ध भूषण गोपनारायण यांची पत्रकार परिषदेत मागणी

14 ऑकटोबर 2024या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन नोकर भरतीला स्थगिती द्यावी 
री पां ई चे बुद्ध भूषण गोपनारायण यांची पत्रकार परिषदेत मागणी 


अकोला 
डॉ. पंजाबरावं देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे शासन निर्णय क्र. कृषी वि -3723/प्र. क्र. 169 /6 ए दि. 14 ऑकटोबर 2024 या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन निघालेल्या नोकर भरती संदर्भात कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे महा संचालक यांचे आदेशान्वये चौकशी समिती गठीत झाली आहे. त्यामध्ये सन 2001 ते 2004 पर्यंत बंद केलेले प्रकल्प ग्रस्त एकाच कुटुंबातील 3 ते 4 युवकांना प्रकल्प ग्रस्त म्हणून नोकरीत स्थायी करून घेतले आहे. ज्यांची शेती विद्यापीठात गेली आहे. याबाबत चौकशीझाली असून चौकशी अधिकारी यांनी संबंधित चौकशी मध्ये उच्च स्तरीय चौकशी समिती ची शिफारस केली आहे. त्यामुळे संबंधित नोकर भरती निघण्याच्या आधी 20 डिसेंबर 2024 रोजी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे मुख्य सचिवालय तसेच कृषी सचिव यांना निवेदन देऊन 14 ऑकटोबर 2024 रोजी पारित शासन निर्णया ची पुनरतपासणी व कृषी परिषद मार्फत चालू असलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित आदेशाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी 2 महिने आधीच केलेली असल्यामुळे 14 ऑकटोबर 2024या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन नोकर भरतीला स्थगिती द्यावी अशी मागणी आज अकोल्यात री पां ई चे युवक अध्यक्ष बुद्ध भूषण गोपनारायण यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली आहे. यावेळी युवक जिल्हा महासचिव अजय हरिहर गवई, प्रकाश सदांशी व, युवक जिल्हा सचिव संघदीप शेगावकर, अजय सिरसाट, सागर जामनिक, दत्तात्रय ठाकूर यांची उपस्थिती होती.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या