तीन दिवस बार्शीटाकळी रेल्वे गेट राहणार बंद
प्रतिनिधी निलेश इंगळे
बार्शीटाकळी तालुक्यातून जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गावरील रेल्वे फाटक बंद राहणार आहे. बार्शीटाकळी रेल्वे स्थानकावरील अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुरुस्ती व देखभाल कामासाठी ३ जानेवारीच्या रात्री १० वाजेपासून ते ५ जानेवारीच्या सकाळी ५ वाजेपर्यंत बार्शीटाकळी-अकोला रेल्वे फाटक वाहतुकीसाठी बंद राहिल. त्यामुळे ह्या मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे. त्यानुसार अकोला ते मंगरूळपीर व मंगरूळपीर ते अकोलासाठी बार्शीटाकळी अकोला व्हाया कापशी किंवा बार्शीटाकळी ते अकोला व्हाया पिंपळखुटा, विझोरा, कान्हेरी (सरप) याप्रमाणे राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या