अकोला जिल्हा सब ज्युनिअर व ज्युनिअर नेट बॉल संघाची निवड चाचणी
प्रतिनिधी- नागोराव तायडे
मुर्तिजापूर अकोला- धुळे येथे दिनांक 10 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुले मुली नेट बॉल स्पर्धा आयोजित करण्यात येतं आहे.
या स्पर्धेत अकोला जिल्हा सब ज्युनिअर मुले मुली नेट बॉल संघ व ज्युनिअर मुले मुली नेट बॉल संघ सहभागी होणार आहे. त्या साठी दोन्ही संघाची निवड चाचणी दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता प्रशिक्षण मैदान गाडगे महाराज विद्यालय मेनरोड, मूर्तिजापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
सब ज्युनिअर गट खेळाडूच जन्म 10/01/2009.ज्युनिअर गट खेळाडूच जन्म 10/01/2006. नंतरचे असावे जिल्हातील ईच्छुक शाळा, महाविद्यालय व खेळाडूंनी, विविध क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी बोनाफाईड,आधार कार्ड व दोन पासपोर्ट फोटो घेऊन निवड चाचणी करीता उपस्थित रहावे. असे आवाहन अकोला जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे चे सचिव, प्राचार्य जयदीप सोनखासकर यांनी केले आहे. अधिक माहिती करिता. रोहन शेळके, मनिष अडगुलवार यांच्याशी संपर्क साधावा.
0 टिप्पण्या