Ticker

6/recent/ticker-posts

निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, चान्नी ठाणे हद्दीतील दिग्रस बू. येथील घटना

निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, चान्नी ठाणे हद्दीतील दिग्रस बू. येथील घटना


प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत दिग्रस बू. शेतशिवारात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि.२९ डिसेंबर रोजीच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली, सावन गजानन गवई रा. दिग्रस बु. असे मृतक युवकाचे नाव आहे. सावन गवई हे गेल्या काही वर्षांपासून लोकांच्या शेती ठोकाबटाईने करीत होता. यंदाही त्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली, मात्र सतत नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याला वाडेगाव येथील शासकीय रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासण्यासाठी पाठविले असून, पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वृत्त लिहीपर्यंत चान्नी पोलिसात कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती,



आत्महत्या पूर्वी भावाला केला फोन 
मृतक सावन गवई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या काही वेळा आधी भावाला फोन करून सांगितले की, भाऊ आईला सांभाळजो असे शेवटचे सांगून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या