राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कारामुळे आपण या पदावर पोहोचलो- मंत्री आकाश फुंडकर
अकोला
शेतकऱ्यांचे नेते माजी कृषी मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबत स्वर्गीय गोवर्धन शर्मा तसेच माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांनी अकोला आणि पश्चिम विदर्भात पक्ष विस्तारासाठी एकत्रित कार्य करून सामाजिक व धार्मिक क्षेत्रामध्ये शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं अशा नेत्यांच्या कष्टामुळे त्याग, तपस्या, परिश्रम विचाराशी एकरूपता बांधिलकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार यामुळे आपण या पदावर पोहोचलो असून त्यांचा आशीर्वाद त्यांना नमन करणे हे आपले कर्तव्य असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी केले.
स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराशी भेट घेऊन गोवर्धन जी शर्मा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले श्रीमती गंगादेवी शर्मा यांचा आशीर्वाद घेतले यावेळी शर्मा परिवाराने त्यांचे स्वागत केले.तसेच संजय भाऊ धोत्रे यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांचा आशीर्वाद मार्गदर्शन घेतलं यावेळी खासदार अनुप धोत्रे व धोत्रे परिवाराने नामदार आकाश कुंडकर यांचे स्वागत केलं
यावेळी अनेक जुन्या गोष्टींना उजाळा देण्यात आला. सत्ता नसताना सामाजिक दायित्व लक्षात घेऊन काम करणारे नेतृत्व हे आपले मार्गदर्शक असल्याचे यावेळी नामदार फुड कर यांनी सांगून अनेक सामाजिक आणि विकासशील विषयावर खासदार अनुप धोत्रे यांच्याशी चर्चा विनिमय केला.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या