Ticker

6/recent/ticker-posts

बोरगाव मंजू हद्दीतील रॉयल धाब्यावरील अवैध डिझेल साठ्‌यावर कार्यवाही एकुण १०० लिटर डिझेल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बोरगाव मंजू हद्दीतील रॉयल धाब्यावरील अवैध डिझेल साठ्‌यावर कार्यवाही एकुण १०० लिटर डिझेल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


अकोला
 २३ डिसेंबर२०२४ रोजी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पथक अकोला जिल्हयात अवैधंधद्‌द्यावर कार्यवाही करणे कामी पेट्रोलींग करीत असता त्यांना माहीती मिळाली की, ग्राम कोळंबी शिवारातील रॉलय धाब्यावर अवैधरित्या पेट्रोल डिझेल ची विक्री होत आहे अश्या मिळालेल्या माहीती वरून स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाने रॉयल धाब्यावर रेड केली असता आरोपी नामे शेख नदीम शेख अहमद वय ३८ वर्ष रा. युन्नाह हॉस्पीटल जवळ गंगा नगर अकोला हा अवैधरित्या विणापरवाना शासकीय वितरण प्रणालीतील वितरीत होणा-या डिझेल चा अंवधरित्या साठा करून त्याचा काळाबाजार करून विक्री करण्याचे उद्देशाने बाळगतांना मिळुन आला. त्याचे पासून एकुण १०० लिटर डिझेल कि अं १०,०००/-रू चे जप्त करण्यात आले असून त्याचे विरूध्द पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास बोरगाव मंजु पोलीस करीत आहे.


सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा., मा.अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डॉगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला स.पो.नि. विजय चव्हाण स्थानिक गुन्हे शाखा अकाला व पोलीस अंमलदार सुलतान पठाण, गोकूळ चव्हाण, अविनाश पाचापोर, चालक अक्षय बोबडे यांनी आणि पुरावठा निरीक्षण अधिकारी श्री. विश्वजीत लिंगायत केली आहे.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या